माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 04:47 PM2018-02-18T16:47:09+5:302018-02-18T16:49:23+5:30
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील शाळेत पाच वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात तक्रार देवू नये यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी माजी मंत्री डॉ.हेमंत भास्कर देशमुख, रवींद्र भास्कर देशमुख, शिक्षक महेंद्र आधार पाटील, प्रतिक शरद महाले व नंदू गुलाब सोनवणे यांच्याविरुध्द जळगावातील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीवर अत्याचार करणा-या अज्ञात व्यक्तीविरुद्धही बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि १८ : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील शाळेत पाच वर्षांच्या एका मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात तक्रार देवू नये यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी माजी मंत्री डॉ.हेमंत भास्कर देशमुख, रवींद्र भास्कर देशमुख, शिक्षक महेंद्र आधार पाटील, प्रतिक शरद महाले व नंदू गुलाब सोनवणे यांच्याविरुध्द जळगावातील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीवर अत्याचार करणा-या अज्ञात व्यक्तीविरुद्धही बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.
अशी घटली घटना
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात पीडित मुलगी बालवाडीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. माजी डॉ.हेंमत देशमुख यांची ही शाळा आहे. ८ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी शाळेत गेली असता मधल्या सुटीत पायरीवर डब्यातील जेवण करीत असताना एक व्यक्ती तेथे आला. चॉकलेट देवून शाळेच्या मागील बाजूस घेऊन गेला व तेथे त्याने पीडितेवर अत्याचार केला.