जळगावात एकाच रुग्णालयाचे फायर ऑडिट तर इलेक्ट्रीकबाबतही संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:39 AM2021-01-13T04:39:47+5:302021-01-13T04:39:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय १ तर महापालिकेचे पाच रुग्णालये आहेत. यातील शासकीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय १ तर महापालिकेचे पाच रुग्णालये आहेत. यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे २०१९ मध्ये फायर ऑडिट झाले आहे. तर महापालिकेच्या पाच रुग्णालयांत केवळ ओपीडी असून एकमेव असलेले प्रसूती रुग्णालय बंद असल्याने त्याचे ऑडिट झाले नसल्याची माहिती आहे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुरेशी मोकळी जागा असून घटना घडल्यास आपत्कालीन व्यवस्था म्हणून आग विझविणारे सिलिंडर प्रत्येक कक्षासमोर लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात केवळ ओपीडी सुरू असल्याचे डॉक्टर सांगतात.
-इलेक्ट्रीक ऑडिटसंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असून ऑडिट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कधी झाले ही माहिती उपलब्ध नसल्याने नक्की ऑडिट झाले आहे किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र, आता पत्र दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाचा विचार केला असता. साडेचार हजार जनतेमागे एक आरोग्य कर्मचारी आहे.