जळगावातील रामेश्वर कॉलनीत किराणा दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:04 PM2018-02-10T23:04:52+5:302018-02-10T23:06:57+5:30
रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात डिगंबर भिला शिंदे यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला शनिवारी रात्री नऊ वाजता शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. यात फ्रिज, फर्निचर व किराणा माल असे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. शेजारील लोकांनीच पाण्याचा मारा करुन आग विझविली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१० : रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात डिगंबर भिला शिंदे यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला शनिवारी रात्री नऊ वाजता शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. यात फ्रिज, फर्निचर व किराणा माल असे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. शेजारील लोकांनीच पाण्याचा मारा करुन आग विझविली.
होमगार्ड असलेले प्रशांत शिंदे यांचे हे किराणा दुकान आहे. वडील डिगंबर शिंदे व आई द्रौपदाबाई हे दोघं जण दुकानात थांबतात. रविवारी रात्री साडे आठ वाजता दुकान बंद करुन पती-पत्नी घरी गेले. त्यानंतर अर्धा तासाने शॉर्ट सर्कीट होऊन अचानक आग लागली. शेजारी असणारे दत्तू भगवान पाटील यांना ही घटना लक्षात आली. त्यानंतर जितेंद्र रामदास वाघ यांनी प्रशांत शिंदे यांना आगीची माहिती दिली. तोपर्यंत रहिवाशीच मदतीसाठी धावून आले होते. अग्निशमन दलाला फोन करुनही बंब आला नाही असे शिंदे यांनी सांगितले.