भवानी पेठेत कापसाच्या गोदामाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:07 PM2020-06-03T12:07:27+5:302020-06-03T12:07:38+5:30

जळगाव : भवानी पेठेतील जमुना मार्केटमधील गाळ्यात हेमराज राजेंद्र चौधरी (५५, अयोध्या नगर) यांच्या मालकीच्या कापसाच्या गोदामाला मंगळवारी सकाळी ...

 Fire at cotton warehouse in Bhavani Peth | भवानी पेठेत कापसाच्या गोदामाला आग

भवानी पेठेत कापसाच्या गोदामाला आग

Next

जळगाव : भवानी पेठेतील जमुना मार्केटमधील गाळ्यात हेमराज राजेंद्र चौधरी (५५, अयोध्या नगर) यांच्या मालकीच्या कापसाच्या गोदामाला मंगळवारी सकाळी आग लागली. त्यात तीन लाखाचा कापूस जळून खाक झाला.
हेमराज चौधरी यांचा भवानी पेठेतील जमुना मार्केटमध्ये गाळा आहे. शेतातील कापूस त्यांनी या गाळ्यात भरून ठेवला होता. मंगळवारी सकाळी गाळ्याच्या बाहेर इमारतीवर इलेक्ट्रीकच्या शॉर्टसर्कीटमुळे कापसाला आग लागली होती. अग्निशमन बंब मागवून आग विझविण्यात आली होती. यात सव्वातीन लाख रुपये किंमतीचा ६५ क्विंटल कापूस अर्धवट जळाला होता. पहिल्या बंबाच्या पाण्यात कापूस पूर्णपणे न विझल्याने दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा कापसाने पेट घेतला. पुन्हा महापालिकेचा बंब बोलाविण्यात आले होते.

Web Title:  Fire at cotton warehouse in Bhavani Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.