बोदवड येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन समारंभात फटाक्याची चिंगारी उडून मंडपास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 01:40 PM2018-01-27T13:40:45+5:302018-01-27T13:41:01+5:30
मंत्री निघाल्यानंतर घडली घटना
ऑनलाईन लोकमत
बोदवड, जि. जळगाव, दि. 27 - बोदवड तालुक्यातील 51 गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या पुनर्जीवनाच्या उद्घाटन समारंभात फटाक्याची चिंगारी उडून मंडपास आग लागली. ही घटना शनिवारी सकाळी बोदवड येथे घडली. सुदैवाने कोणतीह जिवीतहानी झाली नाही.
बोदवड तालुक्यातील 51 गावांच्या पाणीपुरवठा योजनेच्या पुनर्जीवनाच्या उद्घाटन सोहळ्य़ाचे बोदवड येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर ते तेथून निघाले व त्याच वेळी फटाक्यांची आतीषबाजी सुरू असताना चिंगारी उडून मंडपाने पेट घेतला. मात्र वेळीच कर्मचा:यांनी पाण्याचा मारा करून आग विझवली.