पाचोऱ्यात उभ्या ट्रकला आग दुसरी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:20 PM2018-04-04T17:20:27+5:302018-04-04T17:20:27+5:30
पाचोरा : चालकांच्या समयसुचकतेने वाचल्या अन्य ट्रक
आॅनलाईन लोकमत
पाचोरा, दि.४ - रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या खत कारखान्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या ट्रकला बुधवारी अचानक आग लागली. त्यात एक ट्रक जळून खाक झाली तर दुसºया ट्रकला विझविण्यात यश आले. चालकांच्या समयसुचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या खत कारखान्यात भरण्यासाठी आलेल्या अनेक ट्रक या मोकळ्या जागेत उभ्या होत्या. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला. त्यात एक ट्रक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली होती. या ट्रकच्या टायरचे स्फोट होत झाल्यामुळे एकच धावपळ निर्माण झाली. या ट्रकच्या बाजूला असलेल्या ट्रकचालकांनी समयसूचकता दाखवीत भराभर ट्रक बाहेर काढले. काही ट्रकचे ड्रायव्हर उपस्थित नसल्यामुळे ट्रॅक्सचे दार तोडून ट्रक बाहेर काढावे लागले. एम एच १८ के ००३१ या क्रमांकाच्या ट्रकच्या मागच्या टायर्सने पूर्ण पेट घेतला होता. त्या स्थितीत चालकाने कशीबशी ट्रक खत कारखान्याच्या गेट समोर आणून उभी केली. याठिकाणी कर्मचाºयांनी तेथील नळाच्या सहाय्याने पाणी टाकून ही आग विझवली.
आगीत एम एच ०४ डी डी ३०७६ ही ट्रक पूर्णपणे जळाली. तर एम एच १८के ००३१ ही ट्रक ड्रायव्हरच्या समयसूचकतेमुळे बचावली. आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान पोलीस निरीक्षक शाम सोमवंशी आणि पोलीस पथक तसेच अग्निशमन दलाचा बंब आल्यामुळे मुख्य आग विझवण्यात यश आले.