शॉर्ट सर्किटमुळे प्लॉस्टिक फॅक्टरीमध्ये आग, लाखोंचे नुकसान, आठ बंबांचे पाचारण

By सागर दुबे | Published: April 17, 2023 05:02 PM2023-04-17T17:02:38+5:302023-04-17T17:03:44+5:30

अग्निशमन दलाचे जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Fire in plastic factory due to short circuit, loss of lakhs, eight bombs set off | शॉर्ट सर्किटमुळे प्लॉस्टिक फॅक्टरीमध्ये आग, लाखोंचे नुकसान, आठ बंबांचे पाचारण

शॉर्ट सर्किटमुळे प्लॉस्टिक फॅक्टरीमध्ये आग, लाखोंचे नुकसान, आठ बंबांचे पाचारण

googlenewsNext

सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरातील औद्योगिक वसाहतीतील आकाश प्लास्टिक फॅक्टरीमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या आठ बंबांद्वारे पाण्याचा मारा करीत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे दोन ते अडीच तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

अयोध्या नगर येथील रहिवासी खंडू किसन पवार यांची एमआयडीसीमधील जी ७६ मध्ये आकाश प्लॉस्टिक नावाची फॅक्टरी आहे. या कंपनीमध्ये सोमवारी सकाळी अचानक शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पवार यांचा मुलगा हा फॅक्टरीमध्ये आला. तेव्हा त्याला धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पसरले दिसून आले. फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ मनपाच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तर फॅक्टरीमध्ये आग लागल्याचे कळाल्यानंतर बंडू पवार हे सुध्दा त्याठिकाणी पोहोचले होते. त्यांच्यासह इतर कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

शर्थीचे प्रयत्न, आठ बंबांद्वारे पाण्याचा मारा...

घटनेच्या अर्धा ते पाऊण तासानंतर अग्निशमव विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. तब्बल आठ बंबांद्वारे आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला तर फोमचा सुध्दा वापर करण्यात आला. दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. दरम्यान, या आगीमध्ये प्लॉस्टीक वेस्ट वेटेरिअलसह ठिबक नळ्या आणि ठिबक नळ्या तयार करणा-या दोन महागड्या मशिनी जळून खाक झाल्या. या आगीमध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचे फॅक्टरी मालक बंडू पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच बाजूच्या एका कंपनीला सुध्दा आगीची झळ बसली असून त्यात काही पत्रे जळाले आहेत.

Web Title: Fire in plastic factory due to short circuit, loss of lakhs, eight bombs set off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.