फ्रीज घेऊन जाणा-या कंटेनरला जळगाव जिल्ह्यात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:59 PM2018-02-10T22:59:01+5:302018-02-10T23:01:40+5:30

नोयडा येथून हुबळी येथे फ्रीज घेऊन जाणाºया कंटेनरला (क्र.एच.आर.३८ एस.७९६०) शनिवारी दुपारी अचानक आग लागली. भर चौकात कंटेनरने पेट घेतल्याने पळापळ झाली होती. इंजिनमध्ये शार्ट सर्कीटमुळे झाल्याने कंटेनरने पेट घेतल्याची माहिती मिळाली. यात लाखो रुपये किमतीचे फ्रीज जळाले असून कंटेनरचेही नुकसान झाले आहे.

Fire in the Jalgaon district of the container carrying freeze | फ्रीज घेऊन जाणा-या कंटेनरला जळगाव जिल्ह्यात आग

फ्रीज घेऊन जाणा-या कंटेनरला जळगाव जिल्ह्यात आग

googlenewsNext
ठळक मुद्देनोएडा येथून हुबळी येथे जात होता कंटेनरलाखो रुपयांचे फ्रिज जळून खाक चालकाने घेतली उडी

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१०  : नोयडा येथून हुबळी येथे फ्रीज घेऊन जाणा-या कंटेनरला (क्र.एच.आर.३८ एस.७९६०) शनिवारी दुपारी अचानक आग लागली. भर चौकात कंटेनरने पेट घेतल्याने पळापळ झाली होती. इंजिनमध्ये शार्ट सर्कीटमुळे झाल्याने कंटेनरने पेट घेतल्याची माहिती मिळाली. यात लाखो रुपये किमतीचे फ्रीज जळाले असून कंटेनरचेही नुकसान झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुरेशकुमार भजनलाल (रा.एटा, उत्तर प्रदेश) हा चालक नोयडा येथून हुबळी येथे फ्रीज घेऊन जात होता. वावडदा येथे मुख्य चौकात अचानक शॉर्ट सर्कीट होऊन आगीचे लोळ बाहेर आले. हा प्रकार पाहून चालकाने कॅबिनमधून उडी घेतली. वावडदा गावातील रवी कापडणे, पोलीस पाटील मुकुंदा पाटील, धनराज पाटील, जितेंद्र राजपूत, दिनेश पाटील, किरण पवार व दिनानाथ जाधव यांनी गावातून पाणी आणून आग विझवली. म्हसावद दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी, अनिल जाधव, जितेंद्र राजपूत, शशिकांत पाटील, महेंद्र पाटील व सचिन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन जळगाव मनपा व जैन कंपनीतून अग्निशमन बंब मागविले. त्यानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, या घटनेत वित्तीय नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले तरी जीवीत हानी झालेली नाही. आगीचा हा थरार पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Web Title: Fire in the Jalgaon district of the container carrying freeze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.