जळगाव जामोद वन विभागाचे कार्यालय आगीच्या भक्षस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 09:46 AM2018-05-26T09:46:01+5:302018-05-26T09:46:01+5:30
ऑफीस मधील पूर्ण साहीत्य जळून खाक झाले आहे. ०६.३० वाजेपर्यत आग आटोक्यात आली आहे. मात्र, अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
नानासाहेब कांडलकर
जळगांव जामोद : येथील वन विभागाच्या कार्यालयास शनिवारी पहाटे ०५.३० च्या सुमारास अचानक आग लागली. ऑफीस मधील पूर्ण साहीत्य जळून खाक झाले आहे. ०६.३० वाजेपर्यत आग आटोक्यात आली आहे. मात्र, अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आला आहे. विशेष म्हणजे याच कार्यालयापासून काही अंतरावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निवासस्थान आहे. त्यांचे निवासस्थानाला कोणतीही इजा पोहचली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, वनपरिक्षेत्र अधिकारी नवनाथ कांबळे , नगर पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
अग्निशमन दलाने अल्पावधीतच आग आटोक्यात आणली. पण आगीत लाखो रुपयांचा लाकुडसाठा जळून खाक झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी खामगाव व बुलढाणा येथे सुद्धा वन विभागाच्या लाकूडसाठ्यालाही आग लागली होती हे विशेष.