नगरदेवळा येथे कृषी केंद्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:17+5:302021-07-10T04:12:17+5:30
रात्री दहाच्या दरम्यान लागलेल्या आगीचा धुराळा दिसताच, पथदर्शींनी धाव घेत, संचालिका अलका भ़ांडारकर यांना कळविले, तर काह़ींनी दोन कूपनलिका ...
रात्री दहाच्या दरम्यान लागलेल्या आगीचा धुराळा दिसताच, पथदर्शींनी धाव घेत, संचालिका अलका भ़ांडारकर यांना कळविले, तर काह़ींनी दोन कूपनलिका सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेवटी भडगाव व पाचोरा येथील अग्निशमन बंब येऊन त्या़नी आग विझविली. मध्यवर्ती असलेल्या अनुप कृषीच्या आजूबाजूस, सराफी दुकाने, कापूस खरेदी केंद्र व मोठी पतसंस्था आहे. नागरिकांनी तातडीने धावपळ करत आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठे संकट ओढावले असते. घटनेची माहिती कळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर अनुपचे स़ंचालक प्रणव भांडारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून झालेल्या पंचनाम्यात १४ लाख १५ हजारांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले, या घटनेचा पुढील तपास औटपोस्टचे सहायक फौजदार कैलास पाटील, विनोद पाटील, नरेंद्र विसपुते, मनोज पाटील आदी करत आहेत.