जळगाव शहरातील गांधी मार्केटमध्ये मध्यरात्री आगीचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:45 PM2018-03-28T12:45:12+5:302018-03-28T12:45:12+5:30
गांधी मार्केटमध्ये मध्यरात्री दीड वाजता आम नमकीन या फरसाणच्या दुकानाला अचानक आग लागली. त्यात २० हजाराच्या रोकडसह सात लाख रुपयांचे शेव, पोहे, मुरमुरे, फर्निचर, मालमत्तेचे कागदपत्रे, दुकानाचे परवाने, सीसीटीव्ही कॅमरे आदी जळून खाक झाले आहे. वीजेचे होल्टेज कमी जास्त झाल्याने शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२८ : गांधी मार्केटमध्ये मध्यरात्री दीड वाजता आम नमकीन या फरसाणच्या दुकानाला अचानक आग लागली. त्यात २० हजाराच्या रोकडसह सात लाख रुपयांचे शेव, पोहे, मुरमुरे, फर्निचर, मालमत्तेचे कागदपत्रे, दुकानाचे परवाने, सीसीटीव्ही कॅमरे आदी जळून खाक झाले आहे. वीजेचे होल्टेज कमी जास्त झाल्याने शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
गांधी मार्केटमध्ये मुख्य रस्त्याला लागूनच सुभाष मधुकर भोई (वय ४७ रा.जोशी पेठ, जळगाव) यांच्या मालकीचे ओम नमकीन नावाचे दुकान आहे. या दुकानात शेव, मुरमुरे, पोहे यासह फरसाणमधील विविध प्रकारचे पदार्थ ते होलसेल व रिटेलमध्ये विक्री करतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन ते घरी गेले होते.
पोलिसांच्या लक्षात आली घटना
मध्यरात्री दीड वाजता गस्तीवर असलेल्या शनी पेठ पोलिसांना दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजारील फरसाणच्या फलकावरील क्रमांकावर फोन करुन दुकान मालकाला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भोई यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्याअधी पोलिसांनी नियंत्रण कक्ष व अग्निशमन दलालाही घटना कळविली होती.
दोन बंबाद्वारे विझविली आग
अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. बंबांना यायला थोडा उशिर झाला, बंब वेळेवर पोहचले असते तर कदाचित काही माल वाचविता आला असता असे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. यावेळी महावितरणच्या कर्मचाºयांनीही घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा बंद केला. या दुकानाच्या शेजारी एका बाजुला मेडीकल तर दुसºया बाजूला फरसानचे दुकान आहे तर वरच्या मजल्यावर निवासस्थाने आहेत. सुदैवाने या दुकान व घरांना कोणतीही इजा झालेली नाही.