पिंपरूड येथे आॅइल मिलमध्ये आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:47 IST2020-08-28T15:46:45+5:302020-08-28T15:47:47+5:30
आॅइल मिलमध्ये २७ रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे १४ लाखांचे नुकसान झाले.

पिंपरूड येथे आॅइल मिलमध्ये आग
फैजपूर : येथून जवळच असलेल्या पिंपरुड, ता.यावल येथील जगवानी आॅइल मिलमध्ये २७ रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे १४ लाखांचे नुकसान झाले. यात असलेली सरकी तसेच ढेप तयार करणारी आॅइल मिलची मशिनरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली
पिंपरुड सावदा रस्त्यावर आनंद जगवानी यांची जगवानी आॅईल मिल आहे. या आॅईल मिलला गुरुवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीत ढेप बनवण्यासाठी लागणारी सरकी तसेच आॅईल मिलची मशिनरी जाळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच जळगाव येथे राहणारे आॅईल मिलचे मालक घटनास्थळी दाखल झाले तर फैजपूर व सावदा पालिकेच्या अग्निशमन बबांनी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. यावेळी आगेची माहिती मिळताच फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणेसुद्धा घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य करण्यास सहकार्य केले.
या आगीत सरकी तसेच ढेप, आॅईल मिलची मशिनरी असे सुमारे १४ लाखाचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे. पोलिसात आशिष जगवानी यांनी दिलेल्या खबरीवरून आगीची नोंद घेण्यात आली आहे. तपास सपोनि प्रकाश वानखडे व सहाय्यक फौजदार विजय पचपोळ करीत आहे.