मुक्ताईनगर येथे सराफा दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:23 PM2019-07-21T22:23:55+5:302019-07-21T22:26:12+5:30

मुक्ताईनगर येथील बिरारी ज्वेलर्स या दुकानात एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

Fire at Shraddha Shops in Muktainagar | मुक्ताईनगर येथे सराफा दुकानाला आग

मुक्ताईनगर येथे सराफा दुकानाला आग

Next
ठळक मुद्देएसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली आगनागरिकांच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील बिरारी ज्वेलर्स या दुकानात एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या आगीत दुकानाचे फर्निचर व छत जळाले. नागरिकांच्या सतर्कतेने मोठी हानी टळली.
शहरातील प्रवर्तन चौक बºहाणपूर रोडलगत असलेल्या बिरारी ज्वेलर्सचे मालक एकनाथ बिरारी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून घरी निघाले. अवघ्या अर्ध्या तासात बंद दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसून आले. तत्काळ दुकानमालकास ही बाब कळविण्यात आली. दुकानमालक पोहचताच शटर उघडून पाहिले असता एसी पूर्णपणे जळाला. तसेच आगीने दुकानाचे फर्निचर व छताचे तयार केलेले सिलिंग पेट घेत होते. तातडीने दुकानाचा वीजपुरवठा खंडित करून पाण्याने आग विझविण्यात आली.
दुकानमालकाने दुकान बंद करताना एसीचे बटन बंद करण्याऐवजी रिमोटने एसी बंद केला होता आणि यातूनच घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Fire at Shraddha Shops in Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.