तामसवाडीत घराला आग, संसार उघडय़ावर
By admin | Published: May 6, 2017 12:50 AM2017-05-06T00:50:02+5:302017-05-06T00:50:02+5:30
रावेर : बकरी होरपळून ठार, म्हैस व बकरी गंभीर जखमी, रोकडसह अन्नधान्य खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : तालुक्यातील तामसवाडी येथे मोरगाव रस्त्यावर घर बांधकामासाठी रस्त्यापलीकडे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या एका टपरीस व त्या पाठीमागे असलेल्या बांबूच्या जाळींना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्याने त्यात टपरी बाहेर बांधलेली एक बकरी होरपळून जागीच ठार झाली. ग्रामस्थांसह लग्नव:हाडी घटनास्थळी धावून आल्याने त्यांनी आगीत होरपळून गंभीर जखमी झालेली म्हैस व बकरीचे दावे तोडून आगीच्या ज्वाळांमधून बाहेर काढले. टप:यातील गहू, तांदूळ, ज्वारी, सिमेंटच्या गोण्या, कपडे लत्ते, संसारोपयोगी भांडी कुंडी व जीवनावश्यक वस्तूंसह रोख 40 हजार रुपयांची रोकड आगीत भस्मसात झाली. न.पा.च्या अगिAशमन दलाच्या दोन बंबांनी आग नियंत्रणात आणली.
तामसवाडी येथील पुंडलिक सीताराम रायमळे यांचे मोरगाव रस्त्यालगत घर बांधकाम सुरू असल्याने त्यांनी त्याच रस्त्यापलीकडच्या बाजूला एक तात्पुरते टपरे उभारले होते. त्या टप:यात संसारोपयोगी भांडी-कुंडी, अन्नधान्य, बांधकामाचे 90 गोण्या सिमेंट, अंथरूण - पांघरूण, कपडेलत्ते व जीवनावश्यक वस्तूंसह सर्व सामान त्यात साठवून ठेवला होता.
दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अति उष्म्यामुळे सदरच्या टप:यास व त्यामागील शेताच्या बांधावरील बाबूंच्या जाळ्यांना लागलेल्या आगीने रुद्रावतार धारण केल्याने सदरच्या आगीत टप:याबाहेर बांधलेली एक बकरी होरपळून जागीच ठार झाली. या वेळी लग्न व:हाडातून धावून आलेल्या व ङोंडू माधव महाजन (रा.कुसुंबा खु.।।, ता.रावेर) व तामसवाडी येथील किराणा दुकानदार गोकूळ प्रभाकर महाजन यांनी जिवाची पर्वा न करता आगीच्या लोटांमध्येच थेट उडी घेऊन टप:याबाहेर दावणीला बांधलेल्या साधारणत: सात/आठ वर्षाची गाभण म्हैस व बकरीचे दावे बख्खीने कापून सुखरूप बाहेर काढले.
पण गाभण म्हैस व बकरी होरपळून 60 टक्के जळाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्याप्रसंगी गावातून मदतीचा हात देण्यासाठी आलेल्या तरुणाईने त्या टप:याच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला दावणीला बांधलेल्या व्यापा:यांचे तब्बल 28 बैल सुखरूपपणे दावे तोडून वाचवल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सरपंच सुनील तडवी यांनी स्पष्ट केले.
न.पा.च्या दोन अग्निशमन बंबांच्या साहाय्याने कर्मचारी विजय महाजन, मुबारक तडवी व तायडे यांनी आग नियंत्रणात आणली. त्यात एक बकरी, टप:यातील दोन क्विंटल गहू, 50 किलो तांदूळ, 50 किलो ज्वारी, सिमेंटच्या 90 गोण्या, कपडे लत्ते, अंथरूण पांघरूण, संसारोपयोगी भांडी कुंडी व जीवनावश्यक वस्तूंसह रोख 40 रुपयांची रोकड भस्मसात झाले.
तलाठी बी.जी. तिडके, ग्रामसेविका यू.आर. नाईक यांनी सरपंच सुनील तडवी, पोलीस पाटील अरुण पाटील यांच्या समक्ष पंचनामा केला.