खेडी, गांधली येथे आग, लाखोंचे नुकसान
By admin | Published: May 8, 2017 12:44 PM2017-05-08T12:44:42+5:302017-05-08T12:44:42+5:30
अमळनेर : शॉर्टसर्किटमुळे लागली आग
Next
अमळगाव,ता.अमळनेर,दि.8- खेडीसीम येथे कपाशीला तर गांधली येथे बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना रविवारी घडली. यात लाखो रूपयांचे नुकसान झाले.
गांधली येथील जगन्नाथ तानकू चौधरी हे सुरत येथे लगAाला गेले होते. त्यांचे घर बंद होते. या बंद घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात घरातील सहा ते सात क्विंटल धान्य, 50 हजार रूपये रोख जळून खाक झाले.त्याच्या शेजारी असलेल्या घरात कुट्टी भरून ठेवली होती. ती देखील जळून खाक झाली. अगिAशमनदलाने आग आटोक्यात आणली. आगीत चौधरी यांचे जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
खेडीसीम येथे डॉ. संजय भाऊराव पवार यांच्या कपाशी ठेवलेल्या घराला रविवारी सायंकाळी आग लागली.डॉ. पवार यांच्या घराच्या मागच्या बाजुला स्ट्रीट लाईटच्या लोंबकळलेल्या तारा आहे. त्या तारांची स्पार्कीग होऊन, खिडकीतून ठिणग्या घरातील कपाशीवर पडल्याने, आग लागली. या घरात जवळपास 125 क्विंटल कापूस ठेवला होता. त्यापैकी 70 ते 80 क्विंटल कापूस खाक झाला.