म्हसावद येथे जमावाकडून दारु दुकानाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 04:16 PM2017-05-08T16:16:23+5:302017-05-08T16:16:23+5:30

रहिवाशी वस्तीत दारू दुकानाला नागरिकांचा विरोध. विरोध करणा:यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल

Firearm shops in Mhasawad, | म्हसावद येथे जमावाकडून दारु दुकानाची तोडफोड

म्हसावद येथे जमावाकडून दारु दुकानाची तोडफोड

Next

 जळगाव,दि.8- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेले देशी दारु दुकान व बियर बार रहिवाशी वस्तीत स्थलांतर झाल्याने म्हसावद येथे नागरिकांनी विरोध दर्शवत या दोन्ही दुकानांची तोडफोड केली. तीनशेच्या जवळपास महिला व दोनशे पुरुष अशा जणांच्या जमावाने या दुकानांवर हल्ला केला. दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करणा:या चार जणांविरुध्द पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

म्हसावद येथे शेखर भगवान सोनवणे यांच्या मालकीचे देशी दारुचे दुकान व किशोर चौधरी यांच्या मालकीचे निलम बार हे मुख्य रस्त्यावरुन बोरनार रस्त्याला इंदिरा नगर भागात रहिवाशी वस्तीत स्थलांतर झाले. धार्मिक स्थळ व महिलांच्या शौचालयाचा वापरही याच भागातून असल्याने रहिवाशांचा या दोन्ही दुकानांना विरोध होता, तरीही हे दुकान सुरु झाल्याने रविवारी रात्री आठ वाजता तीनशेच्या जवळपास महिला व दोनशेच्यावर पुरुष अशांनी एकत्रित येऊन या दोन्ही दुकानांवर हल्ला चढविला. दुकानातील काम करणा:या नोकरांनाही मारहाण झाली. खुच्र्या, संगणक, पत्र्याचे शेड, वॉटर कुलर आदीची तोडफोड झाली.
किरण शांताराम साळुंखे यांच्या फिर्यादीवरून या आंदोलनाचे नेतृत्त्व करणा:या गणेश आमले, विजय आमले, बबलू व आबा घुले यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Firearm shops in Mhasawad,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.