ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या रात्री दोन तास फटाके फोडता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 08:59 PM2020-12-22T20:59:27+5:302020-12-22T21:00:01+5:30

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ रोजीच्या ख्रिसमस व ३१ डिसेंबर नववर्ष स्वागताच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाक ...

Fireworks can be set off for two hours on Christmas and New Year's Eve | ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या रात्री दोन तास फटाके फोडता येणार

ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या रात्री दोन तास फटाके फोडता येणार

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ रोजीच्या ख्रिसमस व ३१ डिसेंबर नववर्ष स्वागताच्या दिवशी रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाक फोडण्यास जिल्हा प्रशासनाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत जळगाव मनपा हद्दीत रात्री ८ ते सकाळी १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची मुभा जळगावकरांना देण्यात आली होती. दरवर्षी ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करीत उत्सव साजरा केला जातो़ मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसून पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस व ३१ डिसेंबर नववर्ष स्वागताच्या दिवशी नागरिकांना रात्री ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title: Fireworks can be set off for two hours on Christmas and New Year's Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.