पित्याच्या अंत्यसंस्कारात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाकडून फायरींग; छातीत गोळी गेल्याने वृध्दाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 09:25 PM2019-05-11T21:25:12+5:302019-05-11T21:31:23+5:30
अंत्यसंस्कारात मानवंदना म्हणून नातवाने बंदुकीतून हवेत दोन गोळ्या फायर केल्या. त्यानंतर बंदूक लॉक झाल्याने ती सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक असलेल्या वडीलांकडे दिली. लॉक तपासत असतानाअचानक बंदुकीतून गोळी निघाली व शेजारी असलेल्या तुकाराम वना बडगुजर (६५, मुळ रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांच्या छातीत गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता पिंप्री, ता.धरणगाव येथे घडली.
जळगाव : अंत्यसंस्कारात मानवंदना म्हणून नातवाने बंदुकीतून हवेत दोन गोळ्या फायर केल्या. त्यानंतर बंदूक लॉक झाल्याने ती सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक असलेल्या वडीलांकडे दिली. लॉक तपासत असतानाअचानक बंदुकीतून गोळी निघाली व शेजारी असलेल्या तुकाराम वना बडगुजर (६५, मुळ रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांच्या छातीत गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता पिंप्री, ता.धरणगाव येथे घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले निरीक्षक विठ्ठल श्रावण मोकड यांचे वडील श्रावण बारकू मोकड (८५) यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. पिंप्री, ता.धरणगाव येथे सायंकाळी अंत्यंस्कार करीत असताना अग्निडाग देण्यापूर्वी विठ्ठल मोकड यांचा मुलगा दिपेश याने मानवंदना म्हणून स्वत:जवळील बंदुकीतून हवेत दोन वेळा फायर केला. तिस-या फायरला बंदुक लॉक झाली. त्यामुळे त्याने वडीलांकडे दिली. या बंदुकीचे पॉकेट वडीलांकडेच होते. बंदुक लॉक कशी झाली हे तपासत असतानाच अचानक त्यातून एक गोळी सुटली आणि थेट शेजारी थांबलेल्या तुकाराम बडगुजर यांच्या छातीत गेली. या घटनेत बडगुजर जागीच गतप्राण झाले.