पाचोरा तालुक्यात पहिल्याच दिवशी १२५० विद्यार्थ्यांचा पहिलीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:42+5:302021-06-17T04:12:42+5:30
पाचोरा तालुक्यात एकूण १५२ जिल्हा परिषद शाळा असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत गुलाबपुष्प देऊन पहिलीत प्रवेश करून घेतला. ...
पाचोरा तालुक्यात एकूण १५२ जिल्हा परिषद शाळा असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत गुलाबपुष्प देऊन पहिलीत प्रवेश करून घेतला. काही शाळांत विद्यार्थ्यांची जन्म प्रमाणपत्र व्हाॅट्सॲपद्वारे घेऊन प्रवेश देण्यात आले तर काही शाळा मागील वर्षाचे उत्तम प्रतीचे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांकडून जमा करण्यात आले होते त्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. १९ जूनपर्यंत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश देण्याचे नियोजन असल्याचे व तशा सूचना केंद्रप्रमुखांमार्फत सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांचे जिल्हा परिषद शाळेत त्वरित प्रवेश करून घ्यावेत. उत्तम प्रतीचे शिक्षण, अनुभवी व गुणवत्ताधारक शिक्षक, डिजिटल क्लासरूम, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत दाखल होत आहेत. सर्व शाळांची पहिल्या दिवशी स्वच्छता करण्यात आली असून, स्वच्छतागृहांची दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्त्या तात्काळ करण्याचे केंद्रप्रमुखामार्फत मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. तालुक्यात नेरी केंद्रात ७७.६ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थी प्रवेशासाठी सहभाग नोंदविला.