प्रथम भगति संतन कर संगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:25 PM2020-03-15T22:25:52+5:302020-03-15T22:26:15+5:30

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची ...

The first Bhagatan santa kar sanga ... | प्रथम भगति संतन कर संगा...

प्रथम भगति संतन कर संगा...

Next

आजकाल जो तो धावपळीच जीवन जगतोय, प्रत्येकाची एकमेकासोबत स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा पदाच्या हव्यासाची असो किंवा पैसा कमावण्याची असो प्रत्येक जण गोष्टीतून सुख शोधत आहे आणि ते सुख जर कलियुगात प्राप्त करायचे असेल तर एकच साधन ते म्हणजे भक्ती. चार युगे झाली त्यातील सतयुगात सगळीकडे आनंदी आनंद होता त्यानंतर त्रेतायुगात प्रभुश्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने सगळीकडे सुख समाधानाने लोक जीवन जगत होते त्यानंतर द्वापारयुगामध्ये युगामध्ये श्रीकृष्णाचा वास असल्याने सगळीकडे प्रेमाचा भरणा होता. सगळीकडे लोक आयुष्य प्रेमाने जगत होते.
आपल्याला जर सुख मिळवायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे ईश्वरभक्ती. ईश्वराची भक्ती करायची तर कशी करायची तर नवविधा भक्ती सांगितली आहे. त्यात सर्वात प्रथम भक्ती म्हणजे श्रवणभक्ती. भागवत श्रवण करून राजा परीक्षितीच मरण माघारी गेलं इतकी ताकद श्रवण भक्तीत आहे. पण ही भक्ती करण्यास आपल्याला अवघड जाईल म्हणून सर्वात सोपी भक्ती सांगितलेली आहे नामभक्ती. भूतलावर जन्म घेतल्यावर भगवंताला प्राप्त करायचे असेल तर सर्वात सोपे साधन म्हणजे नामभक्ती.
जेव्हा सीतामातेचे रावणाने हरण केले होते तेव्हा सीतामतेला आणण्यासाठी सेतु पुल तयार करावा लागला तेव्हा नुसत्या प्रभुश्रीरामचंद्रांच्या नावाने दगडे तरली होती निर्जीव वस्तूला तारण्याची ताकद नामात आहे. आपल्यालाही हा संसाररूपी भवसागर तरून जायचा असेल तर नाम भक्ती करायला पाहिजे.
राम आणि कृष्ण ही दोन्ही नावे घेऊन ईश्वराचे नामस्मरण करायला हवे या दोन्ही नामाने निश्चित मानव भवसागर तरुन जाईल. वाल्या कोळीने नाम भक्ती केली तर त्यांची वाल्मिकऋषी म्हणून ख्याती मिळवली, हे फक्त नामामुळेच शक्य झाले. नामभक्ती करून आपल्या जीवनात आनंदप्राप्ती करायला पाहिजे यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करून आपण जीवन सार्थकी लावू या...
- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

Web Title: The first Bhagatan santa kar sanga ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव