पहिल्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावल्या पाच गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 06:00 PM2020-06-01T18:00:22+5:302020-06-01T18:03:06+5:30
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी रेल्वे बंद करण्यात आली होती. तब्बल ७०व्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पाच गाड्या लावल्या.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी रेल्वे बंद करण्यात आली होती. तब्बल ७०व्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पाच गाड्या लावल्या.
लॉकडाऊन-५ मध्ये कोरोनासोबत जनजीवन पूर्वपदावर आणण्याकरिता रेल शासनाने नियमात शिथिलता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी गाड्याही हळूहळू सोडण्यात येत आहे. भुसावळ विभागातून १ जूनला डाऊन दिशेने पाच गाड्या धावल्या.
गाडी क्रमांक १०९३ महानगरी एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०९०४५ ताप्ती गंगा एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०२७१५ सचखंड एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०६१ पवन एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०७१ कामायनी एक्सप्रेस या पाच गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावल्या.
श्रमिक गाल्या सोडल्या तर ७० दिवसानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावरून पूर्वीच्या नियमित गाड्या हळूहळू सोडण्यात येत आहे.
सुरक्षितेसाठी उपाययोजना
रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवास्याचे तिकीट कन्फर्म असेल तरच आतमध्ये प्रवेश देण्यात येत असून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटाईज केल्यानंतर रेल्वेस्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे. याशिवाय रेल्वेस्थानकावर असलेल्या प्लाझा स्टॉलवरील फूड पाकीट पॅकिंगमध्ये देण्यात येत आहे. उघडे फूट पॅकेट बंद करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या सामानालाही सॅनिटाईज करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क वापर करण्यावरही भर देण्यात येत आहे.
वर्दळ कमी
एरवी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वर्दळ दिसून येते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच गाड्यांना भुसावळ रेल्वे स्थानकावरून परवानगी मिळाल्याने प्रवाशांची पाहिजे त्या प्रमाणात रेलचेल दिसून आले नाही.