ममुराबादला पहिल्याच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:30+5:302021-05-23T04:15:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीसह ममुराबाद विकास मंच व 'लोकमत'च्या पाठपुराव्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शनिवारी कोविड प्रतिबंधक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीसह ममुराबाद विकास मंच व 'लोकमत'च्या पाठपुराव्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शनिवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ४५ वर्षे वयावरील सुमारे १६५जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली.
मोठ्या लोकसंख्येचा विचार करता स्थानिक आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणाची व्यवस्था करण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे ग्रामपंचायत व ममुराबाद विकास मंचतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. 'लोकमत'नेही त्यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अखेर उशिरा का होईना ममुराबाद येथे लसीकरणाची सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.
ग्रामपंचायतीने चोख व्यवस्था ठेवल्याने कोणताही गोंधळ झाला नाही. धामणगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा बारी यांच्या मार्गदर्शनाखाली समूह वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी विसावे, पर्यवेक्षक संजय महाजन, आरोग्य सेवक प्रकाश पाटील, घनश्याम लोखंडे तसेच आरोग्य सेविका बबिता करोसिया, साठे यांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच हेमंत चौधरी, माजी
सरपंच महेश चौधरी, अमर पाटील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य अनिस पटेल, शैलेश पाटील, गोपाळकृष्ण मोरे, नासीर पटेल, अशोक गावंडे, अनिल पाटील, सचिन पाटील, रामा तिवारी, ज्ञानेश्वर सावळे आदी उपस्थित होते.
-------------
फोटो-
ममुराबाद येथील आरोग्य उपकेंद्रात शनिवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.