जिल्ह्यात २० हजारांवर तरुणांना पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:29+5:302021-05-14T04:16:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १८ ते ४४ वयोगटाच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने अन्य अनेक मोठ्या जिल्ह्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ ते ४४ वयोगटाच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने अन्य अनेक मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक सुरुवात केल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. आतापर्यंत २० हजार ७८६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, सद्यस्थितीत शासनाच्या आदेशानुसार या वयोगटाचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हाभरात ग्रामीणपेक्षा शहरी भागांमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
जिल्हाभरात पहिला व दुसरा डोस असे मिळून एकून ४ लाख ५४ हजार ५४३ जणांनी लस घेतली आहे. यात सर्वाधिक संख्या ही ४५ वर्षांवरील
नागरिकांची आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत उपलब्ध डोसमधून केवळ दुसऱ्या
डोसचे नियोजन केले जात आहे. कारण मध्यंतरी दुसरा डोस न मिळाल्याने
केंद्रांवर प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच लसींचा
पुरवठाही पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे चित्र होते.
दुसरा डोस राहिला
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांच्या लसीकरणाला सुरूवात होऊन तीन महिन्यांच्या वर कालावधी लोटला असला तरी यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस अद्याप बाकी आहे. त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ही ९,६३५, तर फ्रंट लाईन वर्करची संख्या १९,५३४ इतकी आहे.
-----------
असे झाले लसीकरण
आरोग्य कर्मचारी
पहिला डोस : २५१९५
दुसरा डोस १५५६०
फ्रंटलाईन वर्कर
पहिला डोस : ३५९१९
दुसरा डोस १६३८५
१८ ते ४४ वयोगट : पहिला डोस : २०७८६
४५ वर्षांवरील नागरिक
पहिला डोस : २,६९,८५०
दुसरा डोस ७०,८४८
--------------
असा आहे लसीकरणाचा पहिला डोस
अमळनेर ८०६८
भुसावळ २९०७३
बोदवड ३२११
भडगाव ४२८९
चाळीसगाव ७१२९
चोपडा ५९७६
धरणगाव ४२२९
एरंडोल ४०४०
जामनेर ६४६२
मुक्ताईनगर ४२०६
पाचोरा ६८४८
पारोळा ५३१५
रावेर ८५५२
यावल ७२७७
जळगाव ५१२८७
आरोग्य केंद्र ११३४००
उपकेंद्र ११९८०
खासगी रुग्णालये ३९,८९६