सातपुड्यात लामणदिवा आमरी व रोझी जिंजरची पहिल्यांदाच नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:23+5:302021-02-17T04:21:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्याला लाभलेली सातपुडा पर्वतरांग ही जैवविविधतेने नटलेली असून, अनेकवेळा सातपुड्याचे महत्त्व अबाधित होत आहे. ...

First entry of Lamandiva Amri and Rosie Ginger in Satpuda | सातपुड्यात लामणदिवा आमरी व रोझी जिंजरची पहिल्यांदाच नोंद

सातपुड्यात लामणदिवा आमरी व रोझी जिंजरची पहिल्यांदाच नोंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्याला लाभलेली सातपुडा पर्वतरांग ही जैवविविधतेने नटलेली असून, अनेकवेळा सातपुड्याचे महत्त्व अबाधित होत आहे. अनेक दुर्मिळ वनस्पतींची नोंद या भागात नोंद झाली असून, आता पुन्हा वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती अभ्यासक प्रसाद व राहुल सोनवणे यांनी सातपुड्यात लामणदिवा आमरी व रोझी जिंजर या दुर्मिळ वनस्पतींची नोंद केली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच या दोन्हीही वनस्पतींची नोंद झाल्याचा दावा राहुल सोनवणे यांनी केला आहे. तसेच त्यांच्या दाव्याला अनेक वनस्पती अभ्यासकांनी दुजोरा दिला आहे.

सातपुडा पर्वतरांगांमधून प्रथमच लामणदिवा आमरी व रोझी जिंजरची नोंद घेण्यात यश आले आहे. यामुळे पुन्हा एकदा या वनांचे वनस्पती वैभव सिद्ध झाले आहे. त्यांचे या वनस्पती विषयींचे दोन लघुशोधनिबंध नुकतेच ट्रॉपिकल प्लांट रिसर्च व बायोइंफोलेट या विज्ञान पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. रोझी जिंजरची ही नोंद पश्चिम घाटाबाहेरील महाराष्ट्रातील पहिलीच नोंद आहे. याआधी ही वनस्पती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथुन २०१२ मध्ये नोंदवली गेली आहे. रोझी जिंजर व लामणदिवा आमरी या वनस्पतींची ओळख निश्चित करण्यासाठी अनुक्रमे पुणे विद्यापीठाचे डॉ. मिलिंद सरदेसाई व डॉ. आर. जी. खोसे (अहमदनगर) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या संशोधनासाठी डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, डॉ. वरद गिरी, मयुरेश कुलकर्णी, राजेंद्र नन्नवरे, गौरव शिंदे, रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, अमन गुजर, चेतन भावसार यांनी प्रयत्न केल्याची माहिती राहुल सोनवणे यांनी दिली.

कोट..

या वनस्पती अधिवास संवेदनशील असल्यामुळे यांच्या विशिष्ट अधिवासांचे जतन, संवर्धन करणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील आमरींची संख्या लक्षणीय असून जिल्हा जैवविविधता समृद्ध असण्याचे हे निदर्शक आहे.

-राहुल सोनवणे, वनस्पती अभ्यासक

Web Title: First entry of Lamandiva Amri and Rosie Ginger in Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.