चाळीसगावातील पहिल्या फेसबूक लाईव्ह अक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 02:58 PM2020-04-19T14:58:34+5:302020-04-19T14:59:18+5:30
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज उर्फ संभाआप्पा जाधव यांचा मंगल परियण सोहळा आदर्श ठरला आहे.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज उर्फ संभाआप्पा जाधव यांचा मंगल परियण सोहळा आदर्श ठरला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासह सोशल डिस्टन्सिंंग पाळत फेसबूकच्या माध्यमातून वºहाडी व मित्र परिवाराने लाईव्ह अक्षता टाकल्या. टाळेबंदीनंतर चाळीसगाव तालुक्यातील हा असा पहिलाच विवाह असून, युवराज जाधव यांचे कौतुक आहे. विवाहासाठी होणारा खर्च वाचल्याने त्यांनी २५ हजार रुपये कोरोना उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन आदर्श निर्माण केला आहे.
युवराज भीमराव जाधव हे आंबेडकर नगरमध्ये राहतात. चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ते अग्रेसर आहेत. भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी असा त्यांचा प्रवास असून 'पंचम' ग्रुप नावाने ते सामाजिक उपक्रमही राबवितात.
लाईव्ह अक्षता
युवराज जाधव यांचा विवाह चाळीसगाव निवासी सुभाष सातदिवे यांची कन्या वैशाली यांच्याबरोबर लॉकडाऊनपूर्वीच १९ रोजी होणार होता. दोन्ही परिवारांनी सोशल डिस्टन्सिंंग पाळत ठरलेला विवाह पार पाडायचाच. याचा निर्णय घेतला.
त्यानुसार शनिवारी 'विवाहास न येण्याचे आमंत्रण' असे आवाहन समाज माध्यमावर करण्यात आले.
रविवारी दुपारी १२ वाजता हा चाळीसगाव पंचक्रोशीतील लॉकडाऊन काळात फेसबूक लाईव्ह झालेला पहिला विवाह पार पडला. वºहाडी आणि मित्र परिवाराने वधू- वरांवर लाईव्ह अक्षता टाकल्या.
२५ हजार रुपये सहाय्यता निधीला
युवराज व वैशाली या नवदाम्पत्याने विवाह करताना आदर्शच निर्माण केला आहे. टाळेबंदी असताना त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे गर्दी टाळून विवाह केला. विवाहासाठी होणारा खर्च वाचल्याने २५ हजार रुपये कोरोना उपाययोजनांवर करणा-या मुख्यमत्री सहाय्यता निधीस दिले. विवाह पार पडल्यानंतर नवपरिणीत जोडी तहसील कार्यालयात आली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, धर्मभूषण बागूल, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, रोशन जाधव आदी उपस्थित होते.
याबरोबरच कोरोना फायटर्स पोलीस, आरोग्यदूत, पत्रकार यांना मास्क व सॅनिटायझर, सुरक्षा किटही देण्यात आले.
यावेळी सर्वांनी उभायतांना सोशल डिस्टन्सिंंग राखत शुभाशीर्वाद दिले.