जळगाव निवडणुकीतील पहिल्या पाच प्रभागात ४५ लखपती तर २५ कोट्यधीश उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:41 PM2018-07-21T15:41:25+5:302018-07-21T15:43:08+5:30
मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केले असून, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील ४५ उमेदवार हे लखपती तर २५ उमेदवार हे कोट्यधीश आहेत.
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केले असून, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील ४५ उमेदवार हे लखपती तर २५ उमेदवार हे कोट्यधीश आहेत.
मनपाच्या ७५ जागांसाठी १ आॅगस्टला मतदान होणार असून, यासाठी तब्बल ३०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीनंतर निवडणूक विभागाने सर्व उमेदवारांची जंगम मालमत्ता व स्थावर मालमत्तेच्या माहितीसह शैक्षणिक अर्हतेची माहिती निवडणूक विभागाने दोन दिवसानंतर अखेर सर्व माहिती संकेतस्थळावर टाकली. प्रभाग ८ ,९ व १० या प्रभागातील उमेदवारांची यादी जरी संकेतस्थळावर टाकली असली तरी मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती जाहीर होवू शकलेली नाही. प्रभाग १ ते ५ मध्ये सहा उमेदवार हे गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा होवू शकेल असे गंभीर गुन्हे सहा उमेदवारांविरुद्ध आहे. त्यात दोन उमेदवारांवर या प्रकारात एका पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती संकेतस्थळावर नमुद करण्यात आली आहे.
२७ उमेदवार दहावी व १३ उमेदवार बारावी पास
शैक्षणिक अर्हतेमध्ये १० उमेदवार अशिक्षीत आहेत. ६ उमेदवार हे पदव्युत्तर असून १२ उमेदवारांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. २७ उमेदवार हे दहावी तर १३ उमेदवार बारावी पास आहेत. तर २ उमेदवारांनी इतर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले आहे.
करोडपती उमेदवार
सुजाता मोरे, नवनाथ दारकुंडे, अमोल सांगोरे, दत्तात्रय कोळी, शिवचरण ढंढोरे, भारती मोरे, जयश्री धांडे, भारती सोनवणे, चेतना चौधरी, मोहम्मद खालीद मो.बागवान,जितेंद्र भामरे, नजीम नईम खान, मुकूं दा सोनवणे, विष्णू भंगाळे, हेमेंद्र महाजन, सुनील माळी, सदेका फिरोज शेख, ज्योती तायडे,आकांशा शर्मा, संभाजी देशमुख, नितीन लढ्ढा, अनिल पगारीया, फारुख सैय्यद, अब्दुल फारुक मजीद, राखी सोनवणे.