आयएमआर कॉलेजचे ‘द फोर्थ वे’ नाटक ठरले जळगाव केंद्रावर प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:10 PM2017-11-29T22:10:14+5:302017-11-29T22:12:47+5:30
५७ व्या महाराष्ट राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीचे निकाल सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव केंद्रातून केसीई सोसायटीच्या आय.एम.आर.महाविद्यालयाचे ‘द फोर्थ वे’ या नाटकाला प्रथम पारितोषीक मिळाले आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव-दि.२९-५७ व्या महाराष्ट राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीचे निकाल सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव केंद्रातून केसीई सोसायटीच्या आय.एम.आर.महाविद्यालयाचे ‘द फोर्थ वे’ या नाटकाला प्रथम पारितोषीक मिळाले आहे. तसेच या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जवखेडे येथील समर्थ बहुउद्देशिय संस्थेचे ‘उंच माझा झोका गं’ या नाटकास व्दितीय तर डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे ‘ए मायनस अ’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. ६ ते २० नोव्हेंबर दरम्यान शहरातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुभाष भागवत, अरुण शेलार व विजय कुलकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
१. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘द फोर्थ वे’ या नाटकासाठी दिपाली पाटील यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. द्वितीय पारितोषिक ‘उंच माझा झोका गं’ या नाटकासाठी विशाल जाधव ला मिळाले आहे. प्रकाश योजनेसाठी ‘द फोर्थ वे’ साठी सचिन महाजन यांना प्रथम तर ‘ए मायनस अ’ साठी चैताली क्षिरसागर ला व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
२. नेपथ्यासाठी ‘ह्या साल्या एनर्जीचे करायचे काय’ या नाटकासाठी बाळकृष्ण तिडके यांना प्रथम तर ‘उंच माझा झोका ग’ साठी अंकुश काकडे यांना व्दितीय क्रमांक प्राप्त केला. उत्तम रंगभूषेसाठी ‘पुनरपी उ:शाप’साठी श्रध्दा कदम यांना प्रथम तर ‘जीत’साठी संजय चव्हाण यांना व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
३. उत्कृष्ट अभिनयासाठी ‘द फोर्थ वे’ या नाटकासाठी अमरसिंह राजपुत व ‘उंच माझा झोका गं’ या नाटकासाठी अमृता भावे यांना रौप्यपदक मिळाले आहे.
४. पुनम जावरे (ए मायनस अ), आरती गोळीवाले (ए मायनस अ), सरीता तायडे (साऊ), आश्विनी कोल्हे (उंच माझा झोका गं), श्रीकांत कुलकर्णी (जीत), संदीप पाचंगे (ह्या साल्या एनर्जीचे करायचे काय), पंजाबराव आखाडे (बॅलन्सशीट), अमोल ठाकुर (द फोर्थ वे) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.