एरंडोल तालुक्यातील पहिली पिंप्री प्र.चां. ग्रामपंचायत झाली पेपरलेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:21 PM2018-09-15T18:21:07+5:302018-09-15T18:22:05+5:30
अधिकृत घोषणेद्वारे जाहीर
एरंडोल, जि.जळगाव : तालुक्यातील पिंप्री प्र.चां. ग्रामपंचायतीचा पूर्ण कारभार आॅनलाइन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आपले सरकार सेवा केंद्र पिंप्री प्र.चा या ग्रामपंचायतीमधील एक ते ३३ नमुने पूर्ण आॅनलाइन करून ही ग्राम पंचायत पेपरलेस म्हणून घोषित करण्यात आली आहे. १२ सप्टेंबर २०१८ रोजी ही ग्रा.पं. पेपरलेस करण्यात आली.
पिंप्री प्र.चां. ग्राम पंचायतीने पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत व तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत म्हणून मान मिळविला आहे.
सर्व दस्तावेज आॅनलाइन पद्धतीने मिळतील व त्यामुळे वेळेची बचत होईल. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत (५१ ग्रा.पं.) पेपरलेस करण्याबाबत सूचना गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार) यांनी दिल्या आहेत.
१४ रोजी एरंडोल पंचायत समितीतर्फ पिंप्री प्र.चा.ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या विशाल पाटील, उपसरपंच पांडुरंग नामदेव पाटील व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
याकामी आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक कल्पेश शिरोडे यांचे सहकार्य लाभले. तसेच गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार), विस्ताराधिकारी डी.बी.सुरवाडे, अडागळे, जिल्हा व्यवस्थापक किशोर यांचेही मार्गदर्शन मिळाले.
सदर ग्राम पंचायत पेपरलेस करण्यासाठी स्थानिक केंद्र चालक सूर्यकांत पाटील यांनी परिश्रम घेतले. ग्रामसेवक मिलिंद पाटील यांनी त्यांना मदत केली.