दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या जिनिंंग उद्योजकांना पहिल्या पावसाने दिला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 04:03 PM2020-06-08T16:03:51+5:302020-06-08T16:05:10+5:30
दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सरू झालेल्या जिनिंग उद्योगाला पुन्हा पहिल्या पावसाने फटका दिला आहे.
शरद बन्सी
धरणगाव, जि.जळगाव : दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सरू झालेल्या जिनिंग उद्योगाला पुन्हा पहिल्या पावसाने फटका दिला आहे. या पावसात खरेदी केलेला काही कापूस पाण्याने चिंब होऊन खराब झाला आहे. त्यामुळे या कापसाचा लाखो रुपयाचा फटका जिनिंंग उद्योजकांना बसला आहे.
यावर्षी धरणगाव तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन चांगले आले होते. तालुक्यात २६ हजार ९०० हेक्टरमध्ये कापसाची लागवड केल्याने सर्वाधिक कापूस उत्पादन केले होते. शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कापूस घरात भरला होता. मात्र मध्येच ‘कोरोना’मुळे लॉकलाडाऊन सुरू झाले अन् दोन महिने शासकीय कापूस खरेदी व खासगी जिनिंग उद्योग मध्येच बंद झाल्याने शेतकºयांचा कापूस घरातच पडून होता. गेल्या महिन्यात जिनिंंग उद्योग व शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. त्यामुळे शेतकºयांनी विक्रीसाठी कापूस बाहेर काढला. मात्र दि.४ व ५ जून रोजी झालेल्या पावसाने शासकीय कापूस खरेदी केंद्र व जिनिंगमधील कापूस ओला होऊन नुकसान झाल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.