स्वाध्याय उपक्रमात ‘जळगाव’ राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:09+5:302021-01-01T04:12:09+5:30
जळगाव : विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता यावे, या उद्देशाने शासनातर्फे स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड होम अेसेसमेंट (स्वाध्याय) ...
जळगाव : विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन करता यावे, या उद्देशाने शासनातर्फे स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड होम अेसेसमेंट (स्वाध्याय) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्वाधिक विद्यार्थी सहभाग असणारा ‘जळगाव’ जिल्हा हा राज्यात प्रथम ठरला आहे, तर नाशिक विभागातसुध्दा जळगाव जिल्ह्याने बाजी मारली आहे.
महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदतर्फे स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम अेसेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. दर शनिवारी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमास अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळाली. या योजनेंतर्गत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्स्अॅपद्वारे सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजुषा घरच्या घरी उपलब्ध करून देण्यात येते. मराठी आणि गणित या दोन विषयांवर ही सराव चाचणी घेण्यात येते.
या आठवड्यात मारली बाजी...
गेल्या दोन आठवड्यांपासून जळगाव जिल्हा सहभागात तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील ७९ हजार ५१० विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग नोंदवून प्रश्नमंजुषा सोडविली. त्यामुळे या आठवड्यात सर्वाधिक सहभाग असलेला जिल्हा हा जळगाव ठरला आहे. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.