धुळे परिसरात प्रथमच कृष्णमृगाची नोंद!
By admin | Published: May 9, 2017 05:12 PM2017-05-09T17:12:58+5:302017-05-09T17:12:58+5:30
निसर्गप्रेमींमध्ये आनंद : निमडाळे परिसरात अस्तित्व
Next
धुळे,दि.9- शहरालगत निमडाळे गावाजवळ प्रथमच काळवीट अर्थात कृष्णमृग वन्यजीव अभ्यासकांना आढळून आला. धुळे शहराच्या 50 किमी च्या परीघामधली ही पाहिलीच नोंद असल्याने निर्सगप्रेमींमध्ये आनंदाचे वातारण आहे.
साधारण 15 ते 20 घरांचा एक पाडा, जिथे वीज, पाणी व रस्ता या मुलभुत सोयी पण नाहीत अशा ठिकाणचे हे तरुण पाड्यापासून पासून काही अंतरावर असलेल्या एक कोरडया नाल्यात पहारिने खड्डे करीत त्यातून पाणी काढतात, त्यात फक्त स्वता:च्या गरजा न भागवता नाल्याजवळ एक तळे करीत त्यात पाणी टाकतात. जेनेकरुन वन्य जीवांना पण प्यायला पाणी मिळावे.
वन्यजीव अभ्यासक उमाकांत पाटील , हिरेन खत्री आणि तुषार मोरे हे निमडाळे परिसरात लांडग्याचे सर्वेक्षण करत असताना त्यांना काळवीटाची एक जोडी आढळून आली. त्यांनी तेथील गावक:यांसोबत संवाद साधला असता परिसरामध्ये काळविटांच्या 3 ते 4 जोडय़ांचा वावर असल्याची माहिती मिळाली.जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक आणि पक्षीतज्ज्ञ डॉ.व्यवहारे आणि वन विभागाने ही पहिलीच नोंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काळवीट हे दक्षिणेस मालेगाव तर वायव्येस चाळीसगाव परिसरामध्ये आढळतात. या बरोबरच सर्वेक्षणादरम्यान त्यांना खोकड ( इंडियन फॉक्स ) , साळींदर ( प्रोक्युपाईन ) , रान ससे ( इंडियन हेअर ) आढळून आले.