महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:47+5:302021-01-10T04:12:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चरित्रे लिहिली गेली. त्यात एका गोष्टीचा कायमच उल्लेख ओझरता ...

For the first time, research was done on raising funds for Mahatma Gandhi | महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चरित्रे लिहिली गेली. त्यात एका गोष्टीचा कायमच उल्लेख ओझरता करण्यात आला आहे. ती म्हणजे गांधीजी यांनी देशासाठी कसा निधी उभारला. त्यावरच आम्ही काम करण्याचा विचार केला. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने आम्ही त्यावर काम सुरू केले आणि त्यातच पीएचडी केल्याचे डॉ. अश्विन झाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीही गांधीजी आणि महाराष्ट्र या विषयावर पीएचडी केली आहे. लोकमतने त्यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद साधला.

प्रश्न - गांधीजी यांनी निधी कसा उभारला यावरच संशोधन करण्याचा विचार कसा मनात आला.

अश्विन झाला - आम्ही २०१० मध्ये जळगावला आलो. त्यावेळी मी गांधींचे चरित्र वाचायचो आणि भवरलाल जैन ते एकत असत. त्यावेळी चर्चा देखील होत असे. त्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर गांधी यांच्यावर संशोधनासाठी नवनवे विषय मांडले. त्यातूनच जैन यांनी आम्हाला हा विषय सुचवला आणि त्यावर पीएचडी करण्यासही सांगितले. त्यानुसार आम्ही दोघांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. आम्ही आमचे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यापीठात दिले. तर त्याची मुलाखत नोव्हेंबर २०२० मध्ये झाली.

प्रश्न - वेरावळ, गुजरात येथून जळगावला येण्याचा निर्णय कसा घेतला.

अश्विन झाला - मी भावनगरच्या एमएसडब्लु महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी पत्नी शिक्षण घेत होती. ती संशोधनासाठी जळगावला आली. त्यावेळी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष भवरलाल जैन यांनी आम्हाला येथे गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये काम आणि संशोधन करण्यास सांगितले. त्यांचा हा प्रस्ताव आम्ही स्विकारला आणि येथे काम सुरू केले. सध्या मी येथे रिचर्च असोसिएट्स आणि संपादक म्हणून काम करत आहे. तर पत्नी रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहे.

प्रश्न - गांधींवरील या अनोख्या संशोधनातून काय समोर आले.

अश्विन झाला - या संशोधनात गांधी यांनी कशा पद्धतीने निधी संकलित केला. कोणत्या कामासाठी केला. त्यातून त्यांनी काय साध्य केले यावर संशोधन केले आहे. निधी संकलित करताना तो सामान्य माणसांमधून करत असता. बऱ्याचदा ते आपल्याला मिळालेल्या काही वस्तुंचा लिलाव करीत होते. मानपत्रासोबत आलेल्या लाकडी बॉक्स किंवा ज्या वस्तुंची त्यांना गरजच नाही अशा वस्तुंचा संग्रह करण्यापेक्षा त्याचा लिलाव करून ते निधी संकलित करीत.

प्रश्न - गांधींनी पहिल्यांदा सार्वजनिक रुपाने निधी कधी संकलित केला.

अश्विन झाला - लंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी १८९७ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि १४०० पाऊंडाचा निधी उभारला आणि कलकत्ता येथे भारताच्या व्हाईसरॉयकडे पाठवला होता. त्यांनी आयुष्यभरात जवळपास ३०० वेळा निधी संकलित केला. त्यातील १०० वेळा निधी संकलित केल्याची यादी तयार केली आहे. त्यांनी १ कोटी १५ हजार रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडातून उभा केला होता.

--------------------------

अश्विन झाला यांनी ‘गांधी यांनी एकत्र केलेल्या निधीची पद्धत आणि शैली माध्यम, हिशोब कसा ठेवला आणि कसा प्रयोग केला यावर पीएचडी केली आहे. तर त्यांच्या पत्नी निर्मला यांनी गांधीजी आणि महाराष्ट्र यावर पीएचडी केली आहे. त्यांनी गुजरात विद्यापीठातून प्रबंध सादर केले. त्यांना डॉ. सुर्दशन अय्यंगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रबंधांचे पुस्तक स्वरुपात प्रकाशन देखील होणार आहे. त्याचे मराठीसह चार भाषांमध्ये

भाषांतर केले जाणार आहे.

Web Title: For the first time, research was done on raising funds for Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.