भुसावळात गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या जळगावात आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:18 PM2019-07-15T14:18:24+5:302019-07-15T14:18:53+5:30

मध्यरात्री २ वाजता कारवाई : फिर्यादी व आरोपी दोघे सराईत गुन्हेगार

 The fishermen of the fishermen got angry in Jalgaon | भुसावळात गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या जळगावात आवळल्या

भुसावळात गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या जळगावात आवळल्या

Next

जळगाव/भुसावळ: भुसावळ येथे कुटुंंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या खलील अली मोहम्मद शकील (२५, रा़ गेंदालाल मिल, जळगाव) या तरुणावर गोळीबार करणाºया मयुर उर्फ विक्की दीपक अलोने (२५, रा.गेंदालाल मील, जळगाव) व खुुशाल गजानन बोरसे (२३, रा.भुसावळ) या दोघांच्या मुसक्या रविवारी पहाटे २ वाजता महामार्गावर कालिकां माता चौकात आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे ही कारवाई अवघ्या सहा तासातच तसेच हे.कॉ.विजयसिंग पाटील यांनी जीव धोक्यात घालून केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खलील अली शकील अली रा.जळगाव हा रेल्वेमध्ये पाणी व ताक विक्री करण्याचा व्यवसाय करतो. भुसावळ येथे कुटुंंबियांना भेटण्यासाठी गेला असता शनिवारी रात्री ८ वाजता खडका रोड चौफुलीवर त्याच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर विक्की व खुशाल बोरसे फरार झाले होते. नशिब बलवत्तर म्हणून गोळी चुकविल्याने त्यात खलीलचा जीव वाचला. खलील हा चोऱ्यांची खबर पोलिसांना देत असल्याच्या कारणावरून हा गोळीबार झाल्याचा जबाब जखमी खलील अली शकील आली रा.जळगाव यांने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिला आहे. यामुळे पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात जळगाव येथील एलसीबी पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. १५ जुलै रोजी दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
विजयसिंग पाटील यांची सलग कामगिरी
पोलिसांसाठी आव्हान ठरलेल्या दोन मोठ्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याची कामगिरी विजयसिंग पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कौतूक केले असून निंबोल दरोड्याच्या तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.
जीव धोक्यात घालून उचलली जबाबदारी
विक्की हा आपल्या मित्रांना फोन करेलच असा ठाम विश्वास असल्याने विजयसिंग पाटील यांनी त्याच्या संपर्कातील चारही जणांना सोबत घेत थेट भुसावळ गाठले. मात्र दोघंही संशयित तेथे नव्हते. दुसरीकडे विजय पाटील व नरेंद्र वारुळे तांत्रिक माहिती पुरवित होते. रस्त्यात असतानाच विक्कीचा एका मित्राला फोन आला. तु कुठे आहेस म्हणून विचारणा केली असता मित्राने मी भुसावळ येथून जळगावला जात असल्याचे सांगून कालिंका माता चौक ात त्याला बोलावले. तेथे आल्यावर दोघांना बोलण्यात गुंतवून ठेवण्याचे नियोजन केले, त्यानुसार दोन वाजता विक्की व खुशाल चौकात आले. बोलण्यात मग्न झाल्यावर विजयसिंग पाटील यांनी विक्कीवर मागून येत झडप घातली. सर्वात आधी त्याच्याजवळील रिव्हॉल्वर ताब्यात घेतला. तेथूनच पोलीस निरीक्षक रोहोम यांना मोहीम फत्ते झाल्याची माहिती कळविली. दरम्यान, या गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

Web Title:  The fishermen of the fishermen got angry in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.