चिंचोलीतील हल्ला प्रकरणात पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:22+5:302021-05-20T04:17:22+5:30
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे २५ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणातून दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात ...
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे २५ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणातून दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी सचिन सुरेश ढाकणे (वय ३०), राजू ऊर्फ राजेंद्र मधुकर घुगे (वय ४७), संजय मधुकर घुगे (वय ५०), सुधाकर पुना घुगे (वय ५८) व सुरेश काशिनाथ ढाकणे (वय ६०, सर्व रा. चिंचोली ता. जळगाव) या पाच संशयितांना बुधवारी अटक केली. या पाचही जणांना न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिंचोली येथे जुन्या भांडणातून विशाल निंबा वाघ (वय ३०) यांच्या घरात घुसून सचिन सुरेश ढाकणे यांच्यासह इतर संशयितांनी प्रवेश करून विशाल वाघ यांचा भाऊ प्रशांत वाघ, आई रत्नाबाई वाघ व पत्नी पूजा वाघ यांना काठ्या तसेच लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले होते. यादरम्यान संशयितांनी मिरचीची पूड फेकून रत्नाबाई वाघ यांच्या गळ्यातून ७० हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची पोत हिसकावून नेली होती. याप्रकरणी विशाल वाघ यांच्या फिर्यादीवरून संशयित सचिन ढाकणे यांच्यासह नऊ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार यांनी बुधवारी पाच जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाचही जणांना २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.