नगर जिल्ह्यातील चौघांच्या हत्येप्रकरणी जळगावमधून पाच जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 01:37 PM2020-08-23T13:37:13+5:302020-08-23T13:37:13+5:30

स्वस्तात सोने प्रकरण अंगाशी : पैशाची बॅग घेऊन पलायन करताना घडली घटना जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर फाटा (ता.श्रींगोदा) ...

Five arrested from Jalgaon in connection with the murder of four persons in Nagar district | नगर जिल्ह्यातील चौघांच्या हत्येप्रकरणी जळगावमधून पाच जण ताब्यात

नगर जिल्ह्यातील चौघांच्या हत्येप्रकरणी जळगावमधून पाच जण ताब्यात

Next

स्वस्तात सोने प्रकरण अंगाशी : पैशाची बॅग घेऊन पलायन करताना घडली घटना
जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर फाटा (ता.श्रींगोदा) येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या चार जणांच्या हत्येप्रकरणात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जळगाव शहरातून नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (२२), प्रेमराज रमेश पाटील (२२), योगेश मोहन ठाकूर (२२), कल्पना किशोर सपकाळे (४०) व आशाबाई जगदीश सोनवणे (४२) सर्व रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव या पाच जणांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. शनिवारी पहाटे ते अहमदनगरला पोहचले.
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी नातीक कुंजीलाल चव्हाण (४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (३५), नागेश कुंजीलाल चव्हाण (१४) रा.सुरेगाव, ता.श्रींगोदा व  लिंब्या हाबºया काळे (२२, रा.देऊळगाव सिध्दी, ता.अहमदनगर) यांची चाकू व इतर धारदार शस्त्राने हत्या झाली होती. यातील नातीक, श्रीधर व नागेश हे तीन सख्खे भाऊ होते. अक्षय कुंजीलाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अक्षय उंबºया काळे व मिथुन उंबºया काळे यांच्यासह इतर सहा जणांविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
एटीएमकार्डवरुन धागेदोरे जळगावाकडे
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली असता तेथे एक एटीएम कार्ड आढळून आले होते, ते जळगाव शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. अधिकच्या चौकशीत श्रीधर व लिंब्या या दोघांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जळगाव येथून पाच जणांना बोलावले होते. त्यात दोन महिला होत्या. ठरल्याप्रमाणे वेळेवर व ठिकाणावर सर्व जण विसापूर फाट्याजवळ जमले असता जळगावच्या लोकांजवळील पैशाची बॅग हिसकावून दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच जळगावातील एकाने चौघांवर चाकू हल्ला केला. यात प्रतिकार म्हणून दोन्ही गटाने एकमेकावर हल्ला केला. त्यात नातीक, श्रीधर, नोगेश व लिंब्या असे चौघं जण ठार झाले. एटीएम कार्ड व तांत्रिक माहितीच्या आधारावर धागेदोरे जळगावकडे असल्याचे निष्पन्न झाले.
दोन एसपींच्या समन्वयातून संशयित जेरबंद
हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी जळगावातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी जळगावचे अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधून आरोपी व घटनेची माहिती दिली. दोघांच्या समन्वयातून ही जबाबदारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व जळगावचे निरीक्षक बापू रोहोम एकमेकांच्या संपर्कात आले. तेथून उपनिरीक्षक गणेश इंगळे, विश्वास बेरड, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवींद्र घुंगासे व संभाजी कोतकत यांचे पथक शुक्रवारी जळगावात आले. शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास असलेले विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, जितेंद्र पाटील, अशरफ शेख व अलका शिंदे यांचे पथक नगरच्या पथकासोबत दिले. या पथकाने दिवसभर शोध मोहीम राबवून पाचही जणांना ताब्यात घेतले. स्वस्तात सोने घेण्यासाठी आपण तिकडे गेलो होतो व तेथे वाद झाल्याची कबुली या पाचही जणांनी पोलिसांकडे दिली आहे.

Web Title: Five arrested from Jalgaon in connection with the murder of four persons in Nagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव