आमदारासह पाच भाजप पदाधिकाऱ्यांची खडसेंनी केली नड्डा यांच्याकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:12 AM2019-12-28T06:12:59+5:302019-12-28T06:13:06+5:30

कार्याध्यक्षांकडे पुरावेही केले सादर

Five BJP office bearers along with MLA complain to Kelly Nadda | आमदारासह पाच भाजप पदाधिकाऱ्यांची खडसेंनी केली नड्डा यांच्याकडे तक्रार

आमदारासह पाच भाजप पदाधिकाऱ्यांची खडसेंनी केली नड्डा यांच्याकडे तक्रार

Next

अजय पाटील 

जळगाव : माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेवून, पक्षविरोधी काम करणाºया जिल्ह्यातील ५ भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार केली असल्याची माहिती पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात एका आमदाराचाही समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात भाजप उमेदवार अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे पक्षातीलच पदाधिकाºयांचा हात असल्याचे खडसे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. याबाबत चार दिवसांपूर्वी खडसे यांनी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली.
नड्डा यांच्याकडे पाच पदाधिकाºयांची नावे देत, काही पुरावे देखील खडसेंनी सादर केले आहेत. याबाबत आता पक्षनेतृत्वाकडून संबधितांवर काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे. पाचही पदाधिकारी दिग्गज आहेत. त्यांच्या नावांमुळे पक्षनेतृत्व कारवाई करण्यास उशीर करत असल्याचे बोलले जात आहे. तसेच याबाबत संपूर्ण चौकशी व तक्रारीची पूर्णपणे शहानिशा करूनच कारवाई होईल, असेही पक्षाच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे. या पाच पदाधिकाºयांमध्ये एका विद्यमान आमदाराचा समावेश आहे. यासह जि.प.चे आजी व माजी पदाधिकारी, एक माजी आमदार व पक्ष संघटनेतील एका पदाधिकाºयाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही पदाधिकाºयांची गुरुवारी बैठक झाली. नड्डा यांच्याकडून जर याबाबतचा काही खुलासा आला किंवा बोलविण्यात आले, तर काय भूमिका मांडायची याबाबत चर्चा करण्यात आली.

खडसे स्वगृहीच ?
च्नड्डा यांच्यासोबतच्या भेटीनंतर खडसे यांचे सूर बदलले आहेत. खडसे पक्ष सोडणार नसल्याचे भाजप पदाधिकाºयांचा चर्चेतून बोलले जात आहे. च्खडसेंनी आपल्या समर्थक आमदार व भाजपच्या पदाधिकाºयांशी देखील याबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यांनी खडसे यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला. तसेच पक्षविरोधी काम करणाºयांवर कारवाई झाल्यास त्यांचे चेहरेही समोर येतील, असेही खडसे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Five BJP office bearers along with MLA complain to Kelly Nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.