धोतऱ्याच्या बिया खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:50 AM2019-01-11T01:50:34+5:302019-01-11T01:55:41+5:30
चोपडा तालुक्यातील वढोदा येथील एका शेतात खेळणाºया आदिवासी पाच मुलांनी धोतºयाच्या बिया चुकून खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या, गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने हालचाल करून या बालकांना दवान्यात हलविल्याने त्यांचे प्राण वाचल्याची घटना गुरूवारी घडली.
चोपडा : तालुक्यातील वढोदा येथील एका शेतात खेळणाºया आदिवासी पाच मुलांनी धोतºयाच्या बिया चुकून खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या, गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने हालचाल करून या बालकांना दवान्यात हलविल्याने त्यांचे प्राण वाचल्याची घटना गुरूवारी घडली.
चोपडा तालुक्यातील वढोदा येथे माणिक उखा पाटील यांच्या शेतात आदिवासी पावरा समाजातील ५ मुले खेळत असतांना त्यांनी धोतरा या विषारी वनस्पतीच्या बिया चुकून खाल्याने त्यांना विषबाधा होऊन उलट्या होवू लागल्या. ही वार्ता गावातील पोलीस पाटील संदीप रघुनाथ पाटील यांना कळली. त्यांनी तातडीने सदर मुलाना घेवुन त्यांचे मित्र माणिक पाटील, सोपान पाटील, मधुकर पाटील यांच्या मोटारसायकलवरून जवळच असलेले होळनांथे येथे दवाखान्यात घेवून गेले . तेथील डॉक्टरांनी बालकांची स्थिती पाहून त्यांना शिरपुर येथे हलवण्यास सांगितले. पोलीस पाटील व त्यांचे मित्र यांनी लगेच या मुलांना शिरपुर येथील रुग्णालयात हलवले. शिरपुर येथे त्यांच्यावर वेळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. तथापि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने शिरपुर येथील डॉक्टरानी त्यांना धुळे येथे हलवण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस पाटील यांनी लगेच रुग्णवाहिका मागवून त्यामधून त्यांना भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन आणि तेथे वेळीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती ठिक असुन पुढील उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या विषबाधा झालेल्या मुलांचे वडिल रवाजी पावरा, नाना पावरा, भादले, पावरा यांनी पोलीस पाटील यांनी वेळीच तत्परता दाखवून त्यांच्या मुलांचे धोक्यात आलेले प्राण वाचविल्यामुळे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.