धावत्या रेल्वेच्या धडकेत पाच गायी मृत्युमुखी
By विजय.सैतवाल | Updated: November 3, 2024 19:30 IST2024-11-03T19:30:24+5:302024-11-03T19:30:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेच्या धडकेत पाच गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे ...

धावत्या रेल्वेच्या धडकेत पाच गायी मृत्युमुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेच्या धडकेत पाच गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले.
जळगाव शहरातील बजरंग रेल्वे बोगदा ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुला दरम्यान काही गायी धावत होत्या. रेल्वे रुळावर जळगावकडून मुंबईकडे जाणाऱ्या पवन एक्सप्रेस या धावत्या रेल्वेच्या धडकेत पाच गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेमुळे रेल्वे बराच वेळ थांबून होती. मृत गायी बाजूला केल्यानंतर रेल्वे मुंबई कडे रवाना झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीयस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.