बिडगावात पाच दिवस आरोग्य पथक तैनात राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:36 AM2018-07-18T01:36:58+5:302018-07-18T01:37:29+5:30

डायरियाच्या लागणच्या संशयावरून अर्धा डझन अधिकाऱ्यांनी केली पाहणी

 A five-day health team will be posted in Bidgaon | बिडगावात पाच दिवस आरोग्य पथक तैनात राहणार

बिडगावात पाच दिवस आरोग्य पथक तैनात राहणार

Next

बिडगाव, ता.चोपडा, जि.जळगाव : येथे १६ रोजी काही ग्रामस्थांना संडास व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत १७ रोजी आरोग्य यंत्रणा खळबडून जागी झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींसह अनेक अधिकाºयांनी गावात भेट दिली. सकाळीच दाखल झालेल्या या अधिकाºयांनी संपूर्ण गावात पाहणी केली. तसेच गावातील अस्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीला चांगलेच धारेवर धरले व साथरोग नसल्याचे सांगत उपाय म्हणून पाच दिवस आरोग्य पथक गावात तैनात ठेवण्याचे आदेश दिले.
बिडगाव येथे १६ रोजी काही ग्रामस्थांना शौचालय, उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. यामुळे या रुग्णांनी खासगी तसेच शासकीय दवाखान्यात उपचार घेतले. याची लागलीच दखल घेत धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राने त्याच दिवशी गावात पाण्याचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले. गावात डायरिया सदृश्य रूग्ण वाढुन साथ लागू नये म्हणून ‘लोकमत’नेही घटनेवर प्रकाश टाकला. त्यानुसार दुसºया दिवशी आरोग्य सभापती दिलीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर, गटविकास अधिकारी भरत कोसोदे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.बी.कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पी.पी.लासुरकर, आरोग्य विस्तार अधिकारी सुशील सोनवणे, साथरोगपथकाचे दिलीप मराठे यांनी भेट देत पाहणी केली.
काही संशयित रूग्ण आहेत मात्र गावात साथ लागलेली नाही म्हणून ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन आरोग्य सभापती व आरोग्य अधिकारी डॉ.कमलापूरकर यांनी केले. यावेळी केलेल्या पाहणीत मात्र गावात काही खासगी नळांना गळती आढळली. गटारी कमालीच्या तुंबून भरून अस्वच्छ झाल्याचे दिसून आले. पाणीपुरवठा बिना टीसीएल पावडरचा होत असून नियमीत पाणी तपासणीही होत नसल्याचे समोर आले. म्हणून जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी दैनंदिन पाणी शुद्धीकरण नियमित करणे, व्हॉल्व गळती, पाईप गळती असल्यास काढण्यात यावे, स्त्रोताजवळील परिसर स्वच्छ करणे, ठिकठिकाणी असलेले उकीरडे उचलणे, नळगळती काढणे आदी सूचना ग्रामसेवक के.आर.सपकाळे व ग्रामपंचायत प्रशासनाला केल्या व उपाय म्हणून पुढील पाच दिवस गावात आरोग्य पथक तैनात ठेवण्याचे निर्देश दिले.

Web Title:  A five-day health team will be posted in Bidgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.