पाच दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:40+5:302021-04-17T04:15:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जन्मानंतरच कोविडची बाधा असलेल्या पाच दिवसाच्या बालकाचा शुक्रवारी दुपारी कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोनामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जन्मानंतरच कोविडची बाधा असलेल्या पाच दिवसाच्या बालकाचा शुक्रवारी दुपारी कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोनामुळे कमी दिवसाच्या बालकाचा मृत्यू होण्याची ही जळगावातील पहिलीच घटना आहे. दरम्यान, या बाळाची माता ही बाधित असून रुग्णालयात दाखल आहेत.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत लहान मुले व नवजात अर्भक गंभीर होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. यात किनगाव ता. यावल येथील एका गर्भवती महिलेने १० एप्रिल रोजी कोविड रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. मात्र, कमी दिवसाचे असल्याने जन्मानंतर पहिल्या दिवसांपासूनच या बाळाची प्रकृती गंभीर होती. त्याचे वजन कमी होते, शिवाय त्याला श्वास घ्याला त्रास होत होता.
वेळेपेक्षा आधी प्रसुती
मातेच्या पोटात पाणी झाल्यामुळे साडे सात महिन्यातच सिझर करावे लागले. त्यामुळे आधीच कमी दिवसाचे हे बाळ असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. पाचव्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत बाळांचे गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी याकडे बारकाईने लक्ष ठेवावे कुठलेही दुर्लक्ष करू नये, पहिल्या लाटेतील चित्र वेगळे होते. आता वेगळे आहे, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.