वीज कोसळल्याने पाचजणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:34 PM2019-09-26T22:34:47+5:302019-09-26T22:34:58+5:30
भवरखेडे येथील घटना : दुपारी जेवण करीत असतानाच संपले जीवन
धरणगाव : तालुक्यातील भवरखेडे-विवरे परिसरात वीज कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचाच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
भवरखेडे-विवरे परिसरात ढगफुटी होऊन वादळी पाऊस झाला. पावसाने उघडीप दिल्याने शेतात घाईघाईने बाजरीची कापणी करीत असलेल्या पाच जणांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील एक पुरुष व तीन महिला असा चौघांचा समावेश आहे. तर एक महिला दूसऱ्या कुटूंबातील आहे. या घटनेने भवरखेडा येथे आक्रोश झाला.
तालुक्यातील भवरखेडे-विवरे परिसरात गुरुवारी उघडीप असल्याने येथील शेतकऱ्यांनी बाजरी कापणीसाठी शेत गाठले असता दुपारी अचानक ढग भरुन आले. दीड वाजेच्या सुमारास वादळी पाऊस सुरु झाला. त्यावेळी बाजरी कापून भूक लागल्याने शेतात डबा खात असतानाच पाच जणांवर वीज कोसळली. त्यात त्यांचा गाजीच मृत्यू झाला. याामध्ये रघुनाथ दशरथ पाटील (वय ६७), अलका रघुनाथ पाटील ( वय ६०), कल्पना शामकांत पाटील (वय ३५), शोभा भागवत पाटील (वय ५०) हे चार जण एकाच कुटुंबातील तर इतर कुटुंबातील लता उदय पाटील (वय ३२) हे पाच जण जागीच ठार झाले.
उदय पाटील हे दुसºया शेतात काम करीत आसताना ही घटना घडली. त्याने तात्काळ घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थ शेतात येईपर्यंत सर्वजण ठार झाले होते. भवरखेडा येथील पोलीस पाटील रेखा पाटील, बीट हवालदार संतोष थोरात, खुशाल पाटील, काशिनाथ कोळंबे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भवरखेडा येथील नदीस पूर असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यास विलंब झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.