क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिज वाहतूकप्रकरणी पाच डंपर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:05+5:302021-06-05T04:13:05+5:30
एका डंपरमध्ये राज्य परिवहन विभागाच्या नियमानुसार १६ टन गौण खनिज वाहतुकीचा परवाना असतो. परंतु त्याऐवजी प्रत्येक डंफरमध्ये ३० टनांपर्यंत ...
एका डंपरमध्ये राज्य परिवहन विभागाच्या नियमानुसार १६ टन गौण खनिज वाहतुकीचा परवाना असतो. परंतु त्याऐवजी प्रत्येक डंफरमध्ये ३० टनांपर्यंत गौण खनिज मावेल, अशी त्यांची रचना केलेली असते. वास्तविक पाहता वाहन पासिंग नियमानुसार कुठल्याही वाहनाचा आकार बदलविण्याचा अधिकार नसताना बॉडीच्या वर मोठमोठ्या लाकडी किंवा लोखंडी फळ्या जोडून जास्त गौण खनिज सामावण्यासाठी बॉडीचा आकार वाढविला जातो व क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिजाची सर्रासपणे अनियमित वाहतूक केली जात आहे.
ही वाहतूक येथील सपोनि संदीपकुमार बोरसे यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी एमएच-१९-सीवाय सिरीज असलेल्या गाड्या क्रमांक ५३७१, ५३७६, ५३७७, ५३८१ आणि २५३६ पकडल्या. हे सर्व डंपर वरणगाव पोलीस स्टेशनला जमा केले आहेत.
दोन-अडीच वर्षांपासून सतत रात्रंदिवस चाललेल्या या गौण खनिज वाहतुकीकडे मात्र महसूल विभागाचा दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
आरटीओतर्फे ऑनलाइन मेमो
क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज वाहतूकप्रकरणी सपोनि संदीपकुमार बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, डंपरमालकांना आरटीओ विभागातर्फे ऑनलाइन मेमो पाठविण्यात आले आहेत. गौण खनिज महामार्गासाठी वापरले जाणार होते यास सपोनि बोरसे यांनी दुजोरा दिला.