१२ व १७ रोजी पाच तासांचा रेल्वे ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:28+5:302021-08-12T04:21:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव-शिरसोली दरम्यान तांत्रिक कामासाठी १२ व १७ ऑगस्ट रोजी पाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव-शिरसोली दरम्यान तांत्रिक कामासाठी १२ व १७ ऑगस्ट रोजी पाच तासांचा रेल्वे ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम अनेक प्रवासी गाड्यांवर होणार आहे. यासाठी अनेक गाड्यांना ठिकठिकाणी स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे.
यामुळे खालील गाड्या काही स्टेशनला काही वेळासाठी थांबवण्यात येणार आहेत.
१२ रोजी गाडी क्रमांक ०९१४८ भागलपूर-सुरत ही जळगाव येथे १०:४० ते १०:५० थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ०२१०३ एलटीटी-गोरखपूर ही शिरसोली येथे ११:२५ ते १२:५० (एक तास २५ मिनिटे) थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ०२१६५ एलटीटी-गोरखपूर ही ११:४५ ते १२:५० (१ तास ५ मिनिटे) म्हसावद स्टेशनवर थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ०२२५९ मुंबई-हावडा एक्स्प्रेस ही गाडी ११:५० ते १२:५० (एक तास) माहेजी स्टेशनवर थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ०२७७९ वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेस ही गाडी १२ ते १२:५० (५० मिनिटे) पाचोरा स्टेशनवर थांबवण्यात येईल. ०५०१७ एलटीटी-गोरखपूर ही गाडी १२:३५ ते १३:०० (२५) पाचोरा स्टेशनवर थांबवण्यात येईल.
१७ रोजी गाडी क्रमांक ०६५२८ न्यू दिल्ली-बेंगलोर ही गाडी भुसावळ येथे १३:१० ते १५:५५ ( २ तास ४५ मिनिटे) थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ०२१३० प्रयागराज- एलटीटी ही गाडी १३:३० ते १६:०० (२ तास ३५ मिनिटे) भुसावळ स्टेशनवर थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ०२२६० हावडा-मुंबई ही गाडी १३:५५ ते १६:१५ (२ तास २० मिनिटे) भुसावळ स्टेशनला थांबवण्यात येईल.
गाडी क्रमांक ०२५३३ लखनऊ–मुंबई ही गाडी १३:४० ते १६:०० ( २ तास २० मिनिटे) दुसखेडा स्टेशनवर तसेच गाडी क्रमांक ०१०७२ बनारस- एलटीटी १४:३० ते १६:०० (१ तास ३० मिनिटे) सावदा स्टेशनवर थांबवण्यात येणार आहे.