वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडले पाच लाखांना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:49 AM2022-03-21T10:49:13+5:302022-03-21T10:50:26+5:30

नवीन कायद्यानुसार, दुचाकीवर तीन सीट व विना हेल्मेट या दोन्ही प्रकारात तर एक हजार रुपये दंडासह चालकाचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे.

Five lakhs had to talk on mobile while driving! | वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडले पाच लाखांना!

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडले पाच लाखांना!

googlenewsNext

जळगाव : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाईल वर बोलल्यास पहिल्यावेळी पाचशे रुपये तर दुसऱ्या वेळी १० हजार रुपयाचा दंड आकारला जात आहे. जिल्ह्यात नवीन कायदा लागू झाल्यानंतर जानेवारी ते फेब्रवारी या दोन महिन्यात ८ हजार ८८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ९० लाख ५७ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविणाऱ्या ४११ जणांकडून ४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

नवीन कायद्यानुसार, दुचाकीवर तीन सीट व विना हेल्मेट या दोन्ही प्रकारात तर एक हजार रुपये दंडासह चालकाचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे. केंद्र सरकारने ओव्हरस्पीड, सीटबेल्ट, हेल्मेट, वाहतूक नियमांची पायामल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसह अनेक वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये दंड वाढवण्यात आला. त्यामध्ये पाच ते दहापट रकमेची वाढ केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये परवाना रद्द करण्यात येणार असल्याची तरतूद केली आहे

मोबाईलच्या किमतीएवढा दंड
ना लायसन्स वाहन चालविले तर आता चालकाला थेट पाच हजाराचा तर लायसन्स अपात्र केलेले असेल तर थेट दहा हजाराचा दंड आकारला जाणार आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालविले असेल तसेच लायसन्सची मुदत संपलेली असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो. अग्निशमन बंबाला जागा करुन दिली नाही तर दहा हजाराचा दंड भरावा लागतो. या दंडाच्या रकमेत नवीन मोबाईल मिळू शकतो, त्यामुळे नियमांचे पालन करणेच योग्य आहे.

कोणत्या प्रकारात किती दंड वसुली?
भरधाव वेगाने वाहन चालविणे : १२,१३०००
सीट बेल्टचा वापर न करणे : २००४००
दुचाकीवर तीन सीट : १५,४३०००
लायसन्स जवळ न बाळगणे : १३४४५००

पोलीस नाहीत म्हणून मोबाईलवर बोलला आणि कॅमेराने टीपला
बरेच वाहनधारक वाहन चालविताना बिनधास्तपणे मोबाईलवर बोलतात. काही ठिकाणी पोलीस नाहीत असे वाटते तर काही ठिकाणी वाहतूक पोलीस दिसले की मोबाईल काढून खिशात ठेवतात, नंतर पुढे गेले की लगेच मोबाईलवर बोलणं सुरु होते. यामुळे कारवाईतून आपली सुटका झाली असा समज वाहनधारकांचा असतो, मात्र तसे नाही तुम्हाला आता न अडविताही मोबाईल कॅमेऱ्यातून पोलीस कैद करु शकतात व तसे प्रकार आता होऊ लागले आहेत.

हेल्मेटचा नियम नावालाच
हेल्मेट न वापरणाऱ्या १ हजार ३३९ वाहनधारकांवर जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वेगवेगळ्या कलमाखाली ८ हजार ८८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ९० लाख ५७ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आता मोटार वाहन कायदा ११२/१८३ मध्ये सुधारणा करुन दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे. त्यातून स्वत:ला शिस्त लागते, शिवाय अपघाताचा धोका टळतो.वेगाने वाहन चालविल्यास दोन हजाराचा तर मोबाईलवर बोलताना वाहन चालविल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो.
-लिलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
 

Web Title: Five lakhs had to talk on mobile while driving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.