जिल्ह्यात पाच उमेदवारांचे दहा नामनिर्देशनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:58 PM2019-10-01T17:58:44+5:302019-10-01T17:59:03+5:30

जळगाव - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाच उमेदवारांनी दहा नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती जिल्हा ...

Five nomination papers were filed for the five candidates in the district | जिल्ह्यात पाच उमेदवारांचे दहा नामनिर्देशनपत्र दाखल

जिल्ह्यात पाच उमेदवारांचे दहा नामनिर्देशनपत्र दाखल

Next

जळगाव- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाच उमेदवारांनी दहा नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
यामध्ये चोपडा विधानसभा मतदार संघात एक उमेदवाराने एक, रावेर विधानसभा मतदार संघात दोन उमेदवारांनी चार, अमळनेर विधानसभा मतदार संघात एका उमेदवाराने तीन, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात एका उमेदवाराने दोन असे एकूण पाच उमेदवारांनी दहा नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ११ विधानसभा क्षेत्र असून विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास २७ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये मंगळवारी तिसºया दवशी चोपडा-१८, रावेर-२३, भुसावळ-२६, जळगाव शहर-१०, जळगाव ग्रामीण-५, अमळनेर-६, एरंडोल-६, चाळीसगाव-२७, पाचोरा-१०, जामनेर-२५, मुक्ताईनगर-१२ असे आज एकूण १६८ नामनिर्देशनपत्र वितरीत झाले असल्याची माहितीही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Five nomination papers were filed for the five candidates in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.