‘नवजीवन’ अपघातप्रकरणी पाच जणांना अटक

By admin | Published: May 9, 2017 12:50 AM2017-05-09T00:50:15+5:302017-05-09T00:50:15+5:30

अमळनेर : नवजीवन एक्स्प्रेसच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आणखी पाच कामगारांना पोलिसांनी अटक केली.

Five people arrested for 'Navajivan' accident | ‘नवजीवन’ अपघातप्रकरणी पाच जणांना अटक

‘नवजीवन’ अपघातप्रकरणी पाच जणांना अटक

Next

अमळनेर : नवजीवन एक्स्प्रेसच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आणखी पाच कामगारांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश वहाब सैयद यांनी 12 मेर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुळे ठेकेदार मात्र फरार आहे.
रेल्वेचा ब्लॉक न घेता पाडसे स्थानकापासून थोडय़ा अंतरावर दुहेरीकरणाच्या विद्युतीकरणाचे काम करणारे कर्मचारी 650 किलोचा लोखंडी खांब रूळ ओलांडून नेत होते. समोरून रेल्वे आल्याचे पाहून  कामगार घाबरले. रुळातच लोखंडी खांब सोडून पळाल्याने नवजीवनला अपघात होऊन इंजिनात बिघाड झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
सुपरवायझर इब्राहीम अब्दुल रहेमान यास सहायक पोलीस निरीक्षक उदयसिंग साळुंखे यांनी रविवारीच अटक केली होती. फरार झालेले कामगार आरोपी बंगाली फाईल, ख्वाजानगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच  उदयसिंग साळुंखे यांनी मध्यरात्री संतोष विनोद बोबडे (ब्राrाणवाडी, ता.मुलतानी), अमरजितसिंग संजय मंडल, रामवंदन सुरेश मंडल, नवीन अजरुन मंडल (रा.मसई) यांना अटक केली. सपोनि अवतारसिंग चव्हाण यांनी 8 रोजी दुपारी 12 वाजता दुलालचंद बेणी अनरिया (रा.सेलमंडल ठाणाचुरसु) यास अटक केली.

Web Title: Five people arrested for 'Navajivan' accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.