खड्ड्यांमुळे वाहने उलटून ११ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 09:59 PM2019-11-09T21:59:41+5:302019-11-09T21:59:46+5:30

म्हसवेजवळ महामार्गावरील चार घटना । दोन ट्रक धडकले । अंत्यविधीसाठी जाणारे रिक्षातील प्रवासी थोडक्यात बचावले । एक गंभीर

Five people were injured when the vehicles overturned due to the pits | खड्ड्यांमुळे वाहने उलटून ११ जण जखमी

खड्ड्यांमुळे वाहने उलटून ११ जण जखमी

Next

 

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठमोठे खड्ड्े चुकविताना म्हसवे गावाजवळ वेगवेगळे चार अपघात शनिवारी घडले. यात एकूण ११ जण जखमी झाले, तर रिक्षातून अंत्यविधीसाठी जाणारे कुटुंब थोडक्यात बचावले.
असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षा उलटून त्यात सहा जण जखमी झाल्याची घटना ८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. तर याच दरम्यान ९ रोजी पहाटे ४ वाजता ट्रक उलटून चालक जखमी झाला.
जळगाव येथील युनूस शेख इस्माईल (४३), सत्तार फारुख खाटीक (५२), नईम गयास खाटीक (५४), शमीनभी सत्तार खाटीक (४८) सर्व रा.जळगाव हे रिक्षा मध्ये जळगाव येथून मालेगाव ला अंत्ययात्रेसाठी जात होते. या दरम्यान म्हसवे शिवारातील वाकड्या पुलाजवळ असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षा उलटून त्यात सहा जण जखमी झाले. पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी १०८ रुग्णवाहिकेने जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉ.सुनील पारोचे, दीपक सोनार यांनी प्रथमोपचार करून पुन्हा त्याच रुग्णवाहिकेतून जळगाव येथे हलवण्यात आले. यावेळी पारोळा येथील मुस्ताक शफी खाटीक, अक्रम हाजी, इरफान कुरेशी आदी समाजबांधवांनी सहकार्य केले.
दुस-या अपघातात पारोळा-जळगाव रोडवर म्हसवे गावनाजीकच्या पुलावरील जीवघेणे खड्डे चुकविताना एक ट्रक सरळ पुलाच्या खाली जाऊन कोसळला. त्यात चालक जखमी होत वाहनाचे मोठे नुकसान झाले.
९ रोजी पहाटे ४ वाजता एमएच-४०-बीजी-८५४१ हा कच घेऊन एरंडोलकडे जात असलेला ट्रक म्हसवे गावानजीक असलेला मोठा खड्डा वाचविण्याच्या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली नाल्यात कोसळला. यातील चालक किरकोळ जखमी झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद मात्र झाली नव्हती.
तिस-या अपघातात म्हसवे गावनाजीकच्या धोबी घाटाच्या पुलावरील खड्ड्याचा नेमका अंदाज न आल्याने पढील ट्रकला मागून एक ट्रक धडकल्याने यात दोन्ही ट्रकवरील चालक जखमी झाले. तर वाहनांचे नुकसान झाले.
९ रोजी दुपारी ४.२५ वाजता जळगावहूून धळ््याकडे जाणारा ट्रक आरजे-१९-पीएफ-२४८६ हा पुढे चालत होता. म्हसवे गावानजीक धोबी घाटवरील पुलावर असलेला मोठा खड्डा चुकविण्यासाठी या ट्रक वरील चालक निबाराम सोमाराम रा. बाडनेर (राजस्थान) याने अचानकपणे ब्रेक मारल्याने मागून येणारा ट्रक आरजे-०४-जीबी-४३०७ वरील चालक जुगाराम गंगाराम रा.बाडनेर (राजस्थान) याने मागून जबर धडक दिली. या अपघातात दोन्ही ट्रकवरील चालक जखमी झाला तर वाहनांचे नुकसान झाले आहे.
 


तीन तास वाहनांच्या रांगा, वाहतूक खोळंबली
पारोळा : ट्रकला मागून एक ट्रक धडकल्याने रस्त्यावर ट्रक आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होऊन दोन ते तीन किमी वाहनांची रांग लागली होती. क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. यावेळी प्रभारी पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश चौधरी, ईश्वर पाटील, राकेश पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली. या वेळी एक ते दीड तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहन धारक व प्रवाशांचे मोठे हाल झाले. पारोळा-दळवेल, पारोळा-एरंडोल या रोडवर जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत.या महामार्गावर गेल्या आठवड्यातच टेम्पो व दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार झाला होता.


पिंप्री येथे दुचाकीची बैलगाडीला धडक ;
२ जखमी, एक गंभीर
पारोळा : तालुक्यातील मोंढाळे पिंप्री येथील दोन तरुण मोटरसायकलने पारोळ््याकडे येत असताना मोटरसायकल घसरल्याने दोघे जखमी झाले. त्यातील एक गंभीर जखमी असून त्याच्यावर धुळे यथील रुगणालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात ९ रोजी सकाळी १० वाजता घडला. पिंप्री येथील भालचंद्र सुखदेव पाटील (४०) व योगेश नगराज पाटील २५ हे मोटरसायकल एमएच-१९-५०९० ने पारोळयाकडे येत असताना दुचाकी घसरल्याने पुढे असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी प्रथम पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून नंतर धुळे येथे हलविले. यात भालचंद्र पाटील हे गंभीर असून उपचार सुरू आहेत.
याबाबत उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: Five people were injured when the vehicles overturned due to the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.