पाच क्विंटल प्लास्टीक कॅरीबॅग जप्त; मनपाची मोहीम, दोघांवर दंडात्मक कारवाई

By सुनील पाटील | Published: December 28, 2023 04:25 PM2023-12-28T16:25:45+5:302023-12-28T16:26:10+5:30

होलसेल विक्रेत्यांना ५ हजार तर किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकांच्या हातात कॅरी बॅग आढळली तर पाचशे रुपये दंड आकारला जातो.

Five quintal plastic carrybags seized; Municipal campaign, penal action against both | पाच क्विंटल प्लास्टीक कॅरीबॅग जप्त; मनपाची मोहीम, दोघांवर दंडात्मक कारवाई

पाच क्विंटल प्लास्टीक कॅरीबॅग जप्त; मनपाची मोहीम, दोघांवर दंडात्मक कारवाई

जळगाव : ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडी तसेच इतर बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅग वापरत असाल तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, कारण महापालिकेने गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी विठ्ठल पेठ व का.ऊ.शाळेजवळून पाच क्विंटल कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या असून किशोर एकनाथ पाटील (रा.विठ्ठल पेठ, जळगांव) व राहूल सिंग (रा.का.ऊ.कोल्हे शाळा परिसर) या दोघांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.

महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या पथकातील मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश लोखंडे, रमेश इंगळे, मुकादम दिपक भावसार, वालीदास सोनवणे व शरद पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मोहीम राबविली. त्यात किशोर पाटील व राहूल सिंग या दोघांकडे बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅगचा साठा आढळून आला. या कॅरीबॅग जप्त करण्यासह दोघांकडून जागेवरच दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टीक कॅरी बॅग आढळली तर असा होतो दंड
महाराष्ट्रात प्लास्टीक कॅरी बॅग उत्पादनासह विक्रीला बंदी आहे. महाराष्ट्र प्लास्टीक पिशव्यांचे (कॅरी बॅग) (उत्पादन व वापर) नियम २००६ चे कलम ८ अन्वये उत्पादनाच्या ठिकाणी कॅरी बॅग आढळल्या तर २५ हजार रुपये, होलसेल विक्रेत्यांना ५ हजार तर किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकांच्या हातात कॅरी बॅग आढळली तर पाचशे रुपये दंड आकारला जातो.

Web Title: Five quintal plastic carrybags seized; Municipal campaign, penal action against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.