पाच विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड
By अमित महाबळ | Published: December 30, 2023 06:17 PM2023-12-30T18:17:30+5:302023-12-30T18:18:51+5:30
दि. १७ ते २६ जानेवारी या कालावधीत कलिना या ठिकाणी तालीम शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त, दि. २६ जानेवारी रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
पथसंचलनासाठी निवड झालेल्यांमध्ये तीन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्याआधी दि. १७ ते २६ जानेवारी या कालावधीत कलिना या ठिकाणी तालीम शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या पाच विद्यार्थ्यांमध्ये सोनू खूशावह (पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा), ज्ञानेश्वर अंजीखाने (समाजकार्य विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), विशाल कोळी (गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी) हे तीन विद्यार्थी आणि वैष्णवी पाटील (पर्यावरणशास्त्र विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), कल्याणी क्षीरसागर (झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे) या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. निवड झालेल्या रासेयो स्वयंसेवकांचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी कौतुक केले आहे.