‘हल्लाबोल’च्या सांगतासाठी जळगावातून पाच हजार कार्यकर्ते जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 08:11 PM2018-03-03T20:11:16+5:302018-03-03T20:11:16+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकीत आमदार डॉ.पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.३ - उत्तर महाराष्ट्राच्या हल्लबोल आंदोलनाची सांगता नाशिक येथे १० रोजी होत आहे. यावेळी पक्षाचे नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातून तब्बल पाच हजार कार्यकर्ते सांगता कार्यक्रमास जातील, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. याचबरोबर आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाचा ठरावही एकमताने करण्यात आला.
ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शनिवारी दुपारी झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, जिल्ह्याचे निवडणूक निरिक्षक रंगनाथ बाबुराव काळे, कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, संजय गरूड, जिल्हा समन्वयक विकास पवार, माजी आमदार अरूण पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मीनल पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, संजय चव्हाण, सविता बोरसे आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील यांच्यावरील हल्ल्याबद्दल संताप
डॉ.सतीश पाटील यांच्यावर हल्ला झाला होता. या घटनेचा निषेध बैठकीत करण्यात आला. यातील हल्लेखोरांना पोलिसांनी अद्यापही अटक न केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकाºयांना निवेदन
डॉ.सतीश पाटील यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी व या प्रकरणात आरोपींचा छडा लावावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयातर्फे जिल्हाधिकाºयांना शनिवारी सायंकाळी निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी राहूल मुंडके यांनी स्विकारले.